HW Marathi
राजकारण

मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही !

मुंबई | “मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही, जे करणार ते जनतेच्या फायदासाठी करणे,” अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. पुढे ठाकरे असे देखील म्हणाले की “मै भी चौकीदार, भाजपची ही मोहिमेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ही भारताची निवडणूक आहे की, नेपाळची हेच कळत नाही, अशा शब्दात मोदींवर हल्ला चढविला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (१९ मार्च) पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात सायंकाळी ५ वाजता पार पडला आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेची नेमकी  भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

लोकसभा निवडणूक ही मोदी- शहा विरोधात

“मै भी चौकीदार, भाजपची ही मोहिमेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत म्हटले की, “ही भारताची निवडणूक आहे की, नेपाळची हेच कळत नाही, असे बोलून राज ठाकरे यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.” तसेच राज ठकारे पुढे म्हणाले की, मोदी मुक्त भारतासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

मी येथून पुढे जे मेळावे घेणार ते भाजप विरोधात असल्याचे आज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मोदींचे मै भी चौकीदार ही मोहीम मतदारांसाठी रचलेला सापळा असून या सापळ्यात देशताील जनतेने अडकू नये, असे आवाहन राज यांनी केले आहे. मोदी आणि शहा या दोघांना मतदान न करणे.

 

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 •  तुम्हाला कधी भेटलो, पक्षाचा कोणता नेता बोलला का? कधी सीट मागितल्या का? नाही म्हणाले, यानंतर अशोक चव्हाणांनाही विचारले. जर नाही तर मग तुम्ही माध्यमांसमोर का बोलत सुटलात? असा सवाल विचारला
 • मोदी मुक्त भारतासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सर्वात आधी मी म्हटले 
 • मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही
 • मी येथून पुढील सर्व सभा भाजपविरोधात घेणार
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधातील मी पुढे सभा घेणार आहे
 • “मै भी चौकीदार” ही मोहीम मतदारांसाठी रचलेला सापळा आहे
 • भाजपच्या सापळ्या देशातील जनतेने अडकू नका
 • भरताची निवडणूक आहे की, नेपाळ हेच कळत नाही
 • मोदी आणि अमित शहाला मतदान न करने, त्यांना कोणत्याही प्रकारची मते द्यांची नाही
 • ऐवढा खालच्या पातळीचा विचार पंतप्रधान कसे करून शकतात.
 • तुम्ही इमारती बाधा आणि आम्ही चौकीदर
 • एअर स्ट्राईकबाबत धादांत खोटी माहिती भाजप पसरवित आहे
 • भाजप खोट्या फोटोंच्या आधारे खोटा प्रसार करत आहेत
 • रतन टाटा यांनी सांगितल्यामुळे गुजरात पाहायला गेलो होते
 • माझ्यासमोर जे चित्र उभे केले होते ते खोटे होते.
 • रिझर्व्ह बँककडे भीक मागणआरे सरकार युध्दा केस करणार ?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला
 • महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात नंबर वन, मग मोदी गुजरातची खोटी टीमकी वाजतात
 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे हवा गेलेला फुगा अशी बोचरी टीका 
 • ऐवढा खोटा पंतप्रधान मी कधी पाहिली नव्हता
 • सर्वबाबती खोटे बोलणार, माग आणि पुढे काय बोलणार
 • मोदींनी फक्त नेहरू आणि इंदिरा गांधींवर टीका केली आहे
 • तुम्ही सर्वजण विधासभेच्या तयारीला लागा हे सांगण्यासाठी मी येथे आलो आहे
 • गुढीपाडव्याला मी पुन्हा सभा घेईन तेव्हा अजून काही सांगने नाही
 • ६ एप्रिल गुढीपाडव्याला भेटू

Related posts

ईव्हीएम हटवल्याशिवाय विधानसभा होऊ देणार नाही !

News Desk

LIVE UPDATES | महागाई विरोधात कॉंग्रेसची भारत बंदची हाक, बंदला २१ पक्षांचा पाठिंबा

News Desk

…तरीही मला पक्षात मान-सन्मान मिळतो आहेच !

News Desk