HW News Marathi
राजकारण

बारामतीच्या नेत्याचा मी बंदोबस्त करणार !

इंदापूर | “बारामतीच्या नेत्याचा मी बंदोबस्त करतो. तुम्ही काळजी करू नका”, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीकरिता मुख्यमंत्री फडणवीस हे सध्या राज्यभर फिरून प्रचारसभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर, भाजपचे इंदापूरचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस इंदापूरमध्ये बोलत होते. यावेळी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेससह पवार कुटुंबावर टीका केली आहे. “तशीही काय अवस्था झाली आहे पक्षाची. साहेबांच्या पाठीशी कोणीही उभे नाहीत”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांवर शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

“मला माहित आहे कि २४ तारखेला काय होणार ? आता जी गर्दी मी पाहतोय ती गर्दी पाहिल्यानंतर माझ्या मनात तरी कोणतीही शंका नाही कि २४ तारखेला प्रचंड मोठा विजय होणार आहे. मला माहित आहे कि बारामतीचे काही नेते इथे येऊन त्रास द्यायचा प्रयत्न करतील. पण, चिंता करू नका. आता इथून मी बारामतीलाच जात आहे. मी त्यांचा बंदोबस्त करतो. बारामतीच्या नेत्याचाही बंदोबस्त मी करणार आहे”, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

“मी २० वर्षांपासून हर्षवर्धन पाटलांना ओळखतो. कधीही त्यांनी आपला आहे कि दुसरा आहे याचा विचार केला नाही. जो त्यांच्याकडे गेला त्याला मदत करायचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणूनच म्हणतो कि हर्षवर्धन पाटील हा खऱ्या अर्थाने जनतेचा नेता आहे. इंदापूरमध्ये अनेक जण भाजप प्रवेशास इच्छुक होते. मात्र, आमचा डोळा हर्षवर्धन पाटील तुमच्यावरच होता”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन पाटील यांचे कौतुक केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वायनाडमध्ये राहुल गांधी विरोधात २ ‘राहुल गांधी’ तर १ ‘गांधी’ निवडणुकीच्या रिंगणात

News Desk

माझा नवरा मुस्लीम आहे तर मी एक अभिमानी हिंदू !

News Desk

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून निंबाळकर आणि खडसेंना संधी

Aprna