HW News Marathi
राजकारण

‘मविआ’सारख्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढतोय!

मुंबई। “खेळ ओळखा..! महाविकास आघाडीसारख्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे, ” असे भावनिक ट्वीट शिवसेनेचे नेते आणि बंडखोर नेता एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले आहे. पक्षासोबत बंड पुकारल्यामुळे या आमदारांचे कार्यालय फोटली जात आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी ट्विटरद्वारे शिवसैनिकांनसाठी भावनिक ट्विट केले आहे. शिवसेनेमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटा शिवसेनेचे ४० आमदार सामील झाले असून सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीमध्ये थांबले आहेत. यामुळे आता राज्यात महविकास आघाडीचे सरकार संकटात आले.

एकनाथ शिंदेंनी ट्विटरमध्ये म्हटले, “प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, म.वि.आ. चा खेळ ओळखा..! MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित…. आपला एकनाथ संभाजी शिंदे.#MiShivsainik.” पुढे शिंदे म्हणाले, “नैसर्गिक युती व्हावी ही अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. म्हणूनच या विचारधारेसाठी केलेल्या या बंडाच्या भूमिकेला पक्षातील दोन तृतीयांश पेक्षा अधिक आमदार आणि १० सहयोगी अपक्ष आमदारांचे समर्थन आहे.”

बाळासाहेब आणि शिवसेनेचा नावाचा वापर करता येणारन नाही; बैठकी ठराव संमत
दरम्यान, याआधी शिंदेंनी त्यांच्यासोबत असेलेल्या बंडखोरांचे आमदारांचे पत्र ट्वीट केले होते. यानंतर बंडखोर आमदारांचे व्हिडिओ संदेश देखील ट्वीट केला होता. शिंदेंनी समर्थक शिवसना बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच दुसरा गट स्थापन करत आहेत. या सर्व हालचाली सुरु असतानाच शिवसेनेने काल (25 जून) कार्यकारणी बैठक पार पडली. यात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नावाचा दुसरे कोणालाही वापरता येणार नाही, असा ठराव बैठकीत संमत केला आहे.
 

 


 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बलात्कारी राज बल्लभ निर्दोष, शिक्षा हा यादवांचा अपमान, राबडी देवींचे अजब वक्तव्य

News Desk

श्रीलंकेसमोरील आव्हान कठीणच, मात्र जगासमोरही एक नवा धोका !

News Desk

मोदीजी, तुम्ही आमच्या राष्ट्रवादालाच तर घाबरता !

News Desk