नवी दिल्ली | राफेल करारावरुन आज (२ डिसेंबर) लोकसभा सभागृहात भाजप सरकारवर सर्व विरोधी सवालाच्या फैरी झाडल्या. जेटलींनी राहुल यांच्या दिलेल्या प्रश्नांचे उत्तराने आपले समाधान झाले नसून आपले सरकार जर स्वच्छ आणि पारदर्शी असेल तर आपण जेपीसीला का घाबरतो ? असा प्रश्न शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.
Arvind Sawant,Shiv Sena in Lok Sabha: Kaisa offset contractor tha ki jiski company nahi thi abhi, sirf kaghaz pe thi, jab ki HAL ke paas sab tha. Hamari sarkar agar saaf hai to hum kyun darrte hain JPC se? #Rafaledeal pic.twitter.com/qZ6MDXRxKg
— ANI (@ANI) January 2, 2019
संसद सभागृहात यूपीएच्या काळात झालेला १२६ विमानांचा करार मोदी सरकारने ३६ विमानांवर का आणला? या विमानांची किंमत अचानक एवढी कशी वाढली? आणि ४५ हजार कोटींचे कर्ज असणाऱ्या अनिल अंबानींना हे कंत्राट का देण्यात आले?, असे सवाल राहुल गांधींनी उपस्थित करत मोदींवर निशाणा साधला. राहुल यांच्या प्रश्नावर अर्थमंत्री जेटलींनी उत्तरे दिली. तसेच राफेल करारात कुठलाही घोटाळा नसून शस्त्रधारी विमानांची खरेदी केल्यामुळेच याची किंमत वाढल्याचे जेटली सांगितले.
Arun Jaitley in Lok Sabha: When he was young, he was playing in the lap of a certain 'Q' (Quattrocchi). Congress doesn't understand national security. #Rafale https://t.co/px30H3w99k
— ANI (@ANI) January 2, 2019
तसेच जेटलींनी राहुल यांच्या दिलेल्या प्रश्नांचे उत्तराने आपले समाधान झाले नसून सरकार जर स्वच्छ आणि पारदर्शी असेल तर आपण जेपीसीला का घाबरतो ? असा प्रश्न शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. तसेच, ज्याची कुठलिही कंपनी नव्हती असा कसला ऑफसेट कॉन्ट्रॅक्टर होता ? केवळ कागदोपत्रीच कंपनी होती का ?. याउलट एचएएलकडे सर्वच असतानाही एचएएलला काँट्रॅक्ट का दिले नाही, असाही प्रश्न सावंत यांनी विचारला आहे. सरकार पारदर्शक आहे ना, मग होऊ द्या जेपीसी असे म्हणत शिवसेनेनेही राफेल करारावरुन सरकारला आव्हान दिले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.