HW Marathi
राजकारण

उद्या आम्ही सत्तेत आल्यास पालेकरांना आमच्यावरही टीका करण्याचा अधिकार !

पुणे | “मी पालेकरांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. संविधानाने प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार दिला आहे. जर उद्या आम्ही सत्तेत आलो तरी अमोल पालेकरांना आमच्यावर टीका करण्याचा, आमच्या सरकारच्या विरोधात बोलण्याचा अधिकार असेल”, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमोल पालेकर यांची पाठराखण केली आहे.

“अमोल पालेकर असोत किंवा आणखी कुणी, संविधानाने प्रत्येकाला व्यक्त होण्याचा, आपले म्हणणे मांडण्याचा, टीका करण्याचा अधिकारही दिलेला आहे. मी अमोल पालेकर यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. जर उद्या आम्ही सत्तेत आलो तरी त्यांना आमच्या विरुद्ध बोलण्याचा, आमच्यावर टीका करण्याचा अधिकार असेल. पालेकरांना बोलू न देणे हा सरकारविरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. याचा प्रकारचा मी निषेध करते”, असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

मुंबईतील नॅशलन गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टतर्फे(एनजीएमए) शनिवारी (९ फेब्रुवारी) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अमोल पालेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अमोल पालेकर यांचे भाषण सुरु असताना मधेच त्यांना थांबविण्यात आले. अमोल पालेकरांनी सरकार विरोधी बोलण्यास सुरुवात केल्यानंतर त्या कार्यक्रमाच्या मॉडरेटरकडून त्यांना बोलण्यापासून तातडीने रोखण्यात आले.

Related posts

देवेंद्र फडणवीस ‘बोगस माणूस’ तर शरद पवार ‘अविश्वासू’ !

News Desk

मध्य प्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये कोण ?

News Desk

भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य, आमदार आहुजा वादाच्या भौव-यात

News Desk