HW News Marathi
राजकारण

“विधिमंडळ आवारात शाईच्या पेनवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय भेदरटच…”, सामनातून टीका

मुंबई | राज्याचे शिक्षणमंत्री चंद्रकांत यांच्यावर पुण्यातील एका कार्यक्रमात शाईफेक केली होती. यानंतर राज्य सरकारने शाईहल्ल्याचा धसका घेत हिवाळी अधिवेशनात (Winter Session) शाई पेनवर बंदी (Ink Pen Ban) घालण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या शाईच्या पेनवर बंदीवरून सामनाच्या (saamana) आजच्या (21 डिसेंबर) अग्रलेखातून टीका केली आहे. भाजपच्या पुढाऱयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांविषयी अपमानास्पद विधान केल्यामुळे राज्यात संतापाचा भडका उडाला, असेही अग्रलेखात म्हटले आहे.

सामनात म्हटले, “जनतेला सुखावणे तर दूरच, पण दुखावणारे वर्तन सरकार वा सत्तापक्षाच्या पुढाऱयांनी महाराष्ट्रात सुरू केले. आधी तोंडाला येईल ते बरळायचे, जनतेच्या मनातील श्रद्धास्थानांवर आघात करायचा, महापुरुषांची वाटेल तशी बदनामी करायची आणि नंतर धसका घेऊन शाईच्या पेनवर बंदी घालण्याचे भेदरट निर्णय घ्यायचे, यालाच राज्यकारभार म्हणावे काय? शाईवर किंवा पेनवर बंदी घालण्यापेक्षा शाईफेक होणारच नाही असा कारभार करायला काय हरकत आहे! बरे, विधिमंडळात शाईच्या पेनवर बंदी घातल्याने काय साध्य होणार आहे? सरकारला जनतेत मिसळावेच लागते. मंत्र्यांना, लोकप्रतिनिधींना जनतेत जाऊन संवाद करावाच लागतो. मग शाईच्या पेनवर अशी बंदी कुठे कुठे घालणार? त्यामुळे असे शाईबंदीचे उफराटे निर्णय घेण्यापेक्षा उफराटी विधाने करणाऱया पुढाऱयांच्या बेलगाम बोलण्यावर खरे तर बंदी घालायला हवी.”

 

सामनाच्या अग्रलेखात नेमके काय म्हटले

हाराष्ट्रातील सरकार मिंधे तर आहेच; पण आता ते धसका सरकारही बनले आहे. शाईहल्ल्याच्या भीतीने विधिमंडळ आवारात शाईच्या पेनवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय भेदरटच म्हणावा लागेल. शाईवर बंदी घालण्यापेक्षा शाईफेक होणार नाही अशी आचरट विधाने मंत्री व सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी टाळली तर असे बंदीचे घाबरट निर्णय घेण्याची वेळ धसका सरकारवर येणार नाही!

नागपुरात सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला भलतीच हुडहुडी भरलेली दिसते. भाजप नेते व उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर मध्यंतरी पुण्यामध्ये जी शाईफेक झाली त्याचा मिंधे सरकारने भयंकर धसका घेतला व त्यातूनच आता विधिमंडळ आणि परिसरात शाईचे पेन आणण्यावर प्रतिबंध लादण्यात आले. शाईच्या पेनवर बंदी घालण्याचा हा निर्णय हास्यास्पदच म्हणावा लागेल. लेखणीत वापरली जाणारी शाई म्हणजे जणुकाही एके-47 बंदुका किंवा आरडीएक्ससारखे विस्फोटक आहे, अशी भीती राज्यातील भाजप पुढारी व मिंधे सरकारच्या मनात घर करून बसली आहे. त्यामुळेच सोमवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनाच्या आवारात येणाऱया यच्ययावत सर्व व्यक्तींचे पेन तपासण्यात आले व शाईचे पेन विधिमंडळात घेऊन जाण्यावर बंदी घालण्यात आली. अशा प्रकारे पेन वगैरे तपासणे हा पोरकट प्रकार आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर किंवा कुठल्याही नेत्यावर अशा प्रकारची शाईफेक होणे हे वाईटच. अशा घटनांचे समर्थन कदापि करता येणार नाही. मात्र शाईफेक करणे हे जसे चुकीचे आहे, तसेच विधिमंडळाच्या आवारात शाईचे पेन आणण्यावर बंदी घालणे हेदेखील चुकीचेच. लोकशाही राज्यव्यवस्थेत सरकारने जनतेचा विश्वास संपादन करणे, जनतेला आपलेसे करणे आणि

जनतेची मने जिंकणे

अपेक्षित असते. पण महाराष्ट्रात तसे होताना दिसते आहे काय? सरकारचे वर्तन जनतेला सुखावणारे असायला हवे, तरच जनतेच्या मनातही राज्यकर्ते वा सरकारविषयी आपुलकी व ममत्वाची भावना वाढीस लागते. मात्र जनतेला सुखावणे तर दूरच, पण दुखावणारे वर्तन सरकार वा सत्तापक्षाच्या पुढाऱयांनी महाराष्ट्रात सुरू केले. आधी तोंडाला येईल ते बरळायचे, जनतेच्या मनातील श्रद्धास्थानांवर आघात करायचा, महापुरुषांची वाटेल तशी बदनामी करायची आणि नंतर धसका घेऊन शाईच्या पेनवर बंदी घालण्याचे भेदरट निर्णय घ्यायचे, यालाच राज्यकारभार म्हणावे काय? शाईवर किंवा पेनवर बंदी घालण्यापेक्षा शाईफेक होणारच नाही असा कारभार करायला काय हरकत आहे! बरे, विधिमंडळात शाईच्या पेनवर बंदी घातल्याने काय साध्य होणार आहे? सरकारला जनतेत मिसळावेच लागते. मंत्र्यांना, लोकप्रतिनिधींना जनतेत जाऊन संवाद करावाच लागतो. मग शाईच्या पेनवर अशी बंदी कुठे कुठे घालणार? त्यामुळे असे शाईबंदीचे उफराटे निर्णय घेण्यापेक्षा उफराटी विधाने करणाऱया पुढाऱयांच्या बेलगाम बोलण्यावर खरे तर बंदी घालायला हवी. महाराष्ट्रात वाचाळवीर मंत्री व सत्तापक्षाच्या नेत्यांनी तोंडाचा पट्टा सैल सोडून जो काही मैला गेल्या काही दिवसांत बाहेर फेकला, त्यामुळेच महाराष्ट्राचे वातावरण कलुषित व प्रदूषित झाले हे नाकारता येईल काय? हवाबाण सोडून

सामाजिक वातावरण बिघडवण्यात

खास करून भाजपचे पुढारी आघाडीवर आहेत व त्यातूनच राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा दुर्दैवी प्रकार पुण्यात घडला. मात्र त्या घटनेपासून राज्यातील मिंधे सरकार अधिकच बिथरल्यासारखे वागू लागले आहे. भाजपच्या पुढाऱयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांविषयी अपमानास्पद विधान केल्यामुळे राज्यात संतापाचा भडका उडाला. भाज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही छत्रपती शिवरायांचा अपमान केला. प्रसाद लाड यांनीही अशीच बडबड केली. सरकार पक्षानेच महाराष्ट्रातील महापुरुषांची निंदानालस्ती करून महाराष्ट्राची बदनामी चालवल्याने मराठी अस्मिता दुखावली. मराठी मने पेटली व त्याची धग विराट महामोर्चाच्या रूपाने मुंबईच्या रस्त्यांवर 17 डिसेंबर रोजी दिसली. मात्र या संतापाचा लाव्हा सरकारने अजून ओळखलेला दिसत नाही. महाराष्ट्रातील सरकार मिंधे तर आहेच; पण आता ते धसका सरकारही बनले आहे. शाईहल्ल्याच्या भीतीने विधिमंडळ आवारात शाईच्या पेनवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय भेदरटच म्हणावा लागेल. शाईवर बंदी घालण्यापेक्षा शाईफेक होणार नाही अशी आचरट विधाने मंत्री व सत्तापक्षाच्या नेत्यांनी टाळली तर असे बंदीचे घाबरट निर्णय घेण्याची वेळ धसका सरकारवर येणार नाही.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पार्थ पवारांना मत द्या’ सांगत पैसे वाटणारे शेकाप कार्यकर्ते ताब्यात

News Desk

उत्तर भारतीयाला मारहाण केल्याप्रकरणी ३ शिवसैनिकांना अटक

Gauri Tilekar

राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील विधानसभेचे तरुण अध्यक्षपदी

Aprna