HW News Marathi
राजकारण

इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता अंमलबजावणी करा !

मुंबई । “आतापर्यंत इतर समाजांच्या हिताची जपणूक करताना जे काही निर्णय घेतले गेले आहेत त्याला जराही धक्का न लावता हा आता जो काही नवीन वर्ग तयार करण्यात आला आहे त्याला १६ टक्के आरक्षण देण्याची अंमलबजावणी सरकारने करावी. सामाजिक तणाव निर्माण होईल अशी अडचण कुणीही निर्माण करु नये”, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली. म्हणजेच राज्यात इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

नाशिकमधील माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे या भाजपच्या नेत्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शरद पवार बोलत होते.

“सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षांनी केलेल्या भाषणात ते असे म्हणाले आहेत की ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येत नाही. आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परीक्षा आहे. पक्षाच्या अध्यक्षांनी घेतलेली भूमिका त्याला विरोध करुन इथे वेगळी भूमिका घेण्याचे धाडस मुख्यमंत्री दाखवतात की नाही याकडे आमचे लक्ष आहे”, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे

मुस्लिम आरक्षण हे दिलेच पाहिजे. आज या देशामध्ये शैक्षणिकदृष्टया, सामाजिकदृष्टया, आर्थिकदृष्टया अतिशय मागासलेले हे घटक आहेत. त्याच्यामध्ये मुस्लिमांच्यासंबंधी विचार करावाच लागेल. न्यायालयामध्ये त्या गोष्टीला मान्यता मिळाली. मात्र आज हे सरकार धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही, असे म्हणत आहेत. धार्मिक आणि या अन्य धार्मिकतेबाबत एक वेगळी भावना भाजपच्या नेतृत्वाच्या मनात आहे ही राष्ट्रीय ऐक्याला अनुकूल अशी भूमिका नाही. त्यामुळे येत्या काळात मुस्लिम, धनगर समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने साध्वी प्रज्ञा यांची पक्षातून हकालपट्टी करून राजधर्म निभवावा !

News Desk

चार वर्षात राममंदीर का नाही बांधले ?

swarit

अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील लम्पी आजार नियंत्रणात! – राधाकृष्ण विखे-पाटील

Aprna