HW News Marathi
राजकारण

इम्रान खान पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान, आज घेतली पंतप्रधान पदाची शपथ

इस्लामाबाद | पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांनी आज पाकीस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. इम्रान खान हे पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान झाले आहेत. इम्रान खान पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे प्रमुख आहेत. खान यांच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू उपस्थित राहिले होते. सिद्धू यांच्या पाकिस्तानला जाण्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या.

परंतु , सिद्धू यांनी ट्विट करुन राजकारणी म्हणून नव्हे तर मित्र म्हणून आलोय, असे स्पष्ट केले आहे. परंतु, काश्मीरसाठी आतुर असलेल्या मित्रासाठी खास काश्मिरी शाल भेट नेण्याच्या त्यांच्या खेळीला त्यांचे चाहते ‘छा गए गुरू’ अशी दाद देत आहेत. कारण, काश्मीर आमचे आहे, ही आमच्या देशातील भेट आहे, असा सूचक संदेशही त्यांनी या भेटीतून दिला असल्याचे बोलले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संतोष बांगरांनी मंत्रालयातील पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप; काय आहे प्रकरण

Aprna

…तर मग वाजपेयींनी महाभेसळीचे नेतृत्त्व केले काय ?

News Desk

ईडीच्या चौकशीनंतरही माझं तोंड थांबणार नाही !

News Desk