HW News Marathi
राजकारण

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पवार कुटुंबातील ४ जणांची प्रतिष्ठा पणाला !

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही बारामतीत कमळ फुलवू, असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असल्याने या मतदारसंघात जिंकून येणे भाजपसाठी आव्हानात्मक आहे. दरम्यान, या लोकसभा निवडणुकांमध्ये पवार कुटुंबातील ४ जणांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

सुप्रिया सुळे या सध्या बारामतीच्या खासदार आहेत. सुप्रिया सुळे या पुन्हा एकदा त्याच मतदारसंघातून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शिरुर मतदारसंघातून, शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून, तर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे.

एकीकडे पवार कुटुंबीयांनी जर ही निवडणूक लढवली तर केवळ त्या-त्या मतदारसंघांपर्यंत मर्यादित नाही, तर राष्ट्रवादीच्या इतर जागा जिंकण्याची शक्यता वाढण्याचा अंदाज राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे, शरद पवार जर माढा मतदारसंघातून उभे राहिले तर भाजप त्यांचा पराभव करेल. आमची संघटनात्मक रचना अशी आहे की आम्ही शरद पवारांचा पराभव करु शकू. मात्र जर ते बारामतीत उभे राहिले तर आम्हाला कठीण आहे, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसला आज नवा अध्यक्ष मिळणार; मतमोजणीला सुरुवात

Darrell Miranda

मी कधीही गरिबांचे पैसे लुटण्याचे पाप केले नाही !

News Desk

मी नुसते राजीव गांधींचे नाव घेतले अन् त्यांच्या पोटात जोरदार दुखू लागले !

News Desk