HW News Marathi
राजकारण

लोकसभेत काही ठिकाणी राष्ट्रवादीने आघाडीविरोधात काम केले !

मुंबई | यंदाच्या लोकसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही प्रमाणात धुसफूस सुरु असल्याचे दिसत आहे. अजूनही काँग्रेस, राष्ट्रवादीकडून या पराभवाचे खापर एकमेकांवर फोडले जात आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी आघाडीविरोधात काम केल्याच्या जोरदार चर्चा सध्या कॉंग्रेसमध्ये सुरु आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे जेव्हा राष्ट्रवादीसोबत राष्ट्रीय चर्चा होईल त्यावेळी याबाबत चर्चा केली जाईल,असेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

“यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी पक्षविरोधी काम, प्रचार केला”, अशी तक्रार अनेक उमेदवारांनी केल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे. काँग्रेसच्या आढावा बैठकीत काँग्रेस उमेदवारांनी याबाबत तक्रार केल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते. एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीकडून लोकसभेतील चुका टाळून विधानसभेची तयारी सुरु झाल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे मात्र अद्यापही हे २ पक्ष लोकसभेतील पराभवाचे खापर एकमेकांवर फोडत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे शहराचे नाव बदलून जिजापूर ठेवा !

Gauri Tilekar

मुंबईला थर्टी फर्स्टचे वेध

News Desk

सामाजिक न्यायाची पुंगी गाजराची पुंगी ठरू नये | उद्धव ठाकरे

News Desk