HW News Marathi
राजकारण

पवारांचा बालेकिल्ला जिंकण्यासाठी भाजपच्या शहा, इराणीसह गडकरींच्या जाहीर सभा  

बारामती | लोकसभा मतदारसंघ पुरता ढवळून काढण्याची रणनीती महायुतीने आखली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला जिंकण्यासाठी भाजपचे दिग्गज नेते बारामती जाहीर सभा घेणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटचा दिवस २१ एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि उत्तर प्रदेशाचे मुख्ममंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची १९ एप्रिल रोजी त्यांच्या पाठोपाठ २१ एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील सभा बारामतीत होणार आहे.

तसेच स्मृती इराणी आणि योगी आदित्यनाथ यांच्या २१ एप्रिलला हिंजवडी येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. सभा झाली नाही तर किमान रोड शो व्हावा, यासाठी बारामती भाजप आग्रही आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पंकजा मुंडे यांची बारामती एमआयडीसी व इंदापूर तालुक्यात सभा होणार आहे. ना. गिरीश महाजन हे बारामती तालुक्यातील माळेगाव व सांगवी येथे सभा घेणार आहेत. याशिवाय राम शिंदे आणि महादेव जानकर यांच्या सभांची ठिकाणे महायुतीकडून निश्‍चिती केली जात आहेत.

Related posts

…तर राज्यात नवी समीकरणे निर्माण होऊ शकतात !

News Desk

रोज उठून पक्षविरोधी कारवाया चालणार नाहीत !

News Desk

ममता बॅनर्जींचे धरणे आंदोलन मागे

News Desk