HW News Marathi
राजकारण

“गेल्या अडीच वर्षात ‘मविआ’ सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना,” एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

मुंबई | गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला, असे ट्वीट शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हच्या संबोधणाला प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदेंनी दोन ट्वीट करत चार मुद्दे मांडत उद्धव ठाकरेंच्या संबोधणाला घेरण्याचा प्रयत्न केले  आहे. शिंदे बंडखोर आमदारांसोबत त्यांची बैठक सुरू आहे.

एकनाथ शिंदे ट्वीटमध्ये म्हणाले, “१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला. २. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. #HindutvaForever, ३. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक. ४. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे. #HindutvaForever.”

मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्याला तयार

मुख्यमंत्री म्हणाले, “आज सुद्धा सकाळी काँग्रेसचे नेते कमनलनाथजी आणि काल सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन केला होता. मला म्हणाले, उद्धव ठाकरे आम्ही तुमच्यासोबत आहोत. हा त्यांच्या विश्वासाचा विषय आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवल्यानंतर. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री पदी नको असेल. तर काय करायचो. हा मोठा प्रश्न आहे. माझीच लोक बोलत असतील की, त्यांना त्यांना तुम्ही हवे आहे, परंतु आम्हाला तुम्ही नको. मग मला हेच बोलयाचे आहे की, माझ्या लोकांना मी त्यांना माझे म्हणतोय, ते मला आपले माणत आहे की नाही ते मला माहीत नाही. कारण ते माझ्यासमोर नाहीत. तर तुम्ही इथे येवू बोलयाला काय हरकत नव्हती. तुम्ही सुरतला जावून बोलण्यापेक्षा सरळ समोर येईचे म्हणायचे की,  उद्धवजी तुम्ही कारभार करायला नालायक आहात. हे कोव्हिडच्या काळातील टॉप पाच सोडून द्या. आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री पदी नको ठिक आहे, मी मुख्यमंत्री पदावरून उठतो. आणि आज पण मी तुम्हाला सांगतो. त्यांच्यापैकी एकाही आमदारांनी मला सांगितले. किंवा त्यांनी जर स्टेटमेंट दिले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर नको, तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्याला तयार आहे. जर त्यावर विश्वास नसेल तर आज आपले फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर आज सांध्याकाळपासून मी माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवत आहेत.”

मी माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवेन

“मी मुख्यमंत्री पदावरून उठतो. आणि आज पण मी तुम्हाला सांगतो. त्यांच्यापैकी एकाही आमदारांनी मला सांगितले. किंवा त्यांनी जर स्टेटमेंट दिले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर नको, तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्याला तयार आहे. जर त्यावर विश्वास नसेल तर आज आपले फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर आज सांध्याकाळपासून मी माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवत आहेत,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

संबंधित बातम्या

मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही! – उद्धव ठाकरे

“मी मुख्यमंत्री पदी नको, समोर येऊन सांगा मग…,” मुख्यमंत्र्यांचे एकनाथ शिंदेंना भावनिक आवाहन

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला आजपासून प्रारंभ

News Desk

ईशान्य मुंबईच्या जागेचा तिढा सोडविण्यासाठी उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू

News Desk

सिबीआय कार्यालयाबाहेर राहुल गांधींचे आंदोलन

swarit