HW Marathi
राजकारण

लोकसभा निवडणुकीत मनसे काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार करणार

मुंबई | आपण आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १९ मार्च रोजी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मेळाव्यात केली होती. परंतु, आता मनसेकडून महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे शनिवारी (३० मार्च) स्पष्ट करण्यात आले आहे.

मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात शनिवारी बैठक पार पडली असून या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. मनसे विभाग अध्यक्षांच्या बैठकीत बाळा नांदगावकर यांनी उपस्थितांना याबद्दल स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेना आणि भाजपला उघडपणे विरोध करा, अशा स्पष्ट सूचना यावेळी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी मनसे महाराष्ट्रभर प्रचार करणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट त्यांच्या १९ मार्चला घेण्यात आलेल्या मनसैनिकाच्या मेळाव्यात म्हटले होते. तसेच या मेळाव्यात राज ठाकरे यांनी “मै भी चौकीदार” या भाजपच्या मोहिमेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. ही भारताची निवडणूक आहे की, नेपाळची हेच कळत नाही, अशा शब्दात मोदींवर हल्ला चढविला होता.

 

Related posts

वाजपेयींची प्रकृती सध्या स्थिर

News Desk

#LokSabhaElections2019 : मनसे आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नाही

News Desk

शबरीमाला मंदिरात महिलांचा प्रवेश ही विनाशकारी घटना !

News Desk