HW News Marathi
राजकारण

मतदान केंद्रात चक्क ‘नमो फूड’, कोतवाली सेक्टर २०मध्ये गोंधळाचे वातावरण

नवी दिल्ली | उत्तर प्रेदशातील नोएड सेक्टर १५ मधील मतदान केंद्रात ऑन ड्यूटी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नेण्यात आलेल्या जेवणावर ‘नमो फूड’ लिहले होते. तर हे मतदान केंद्र कोतवाली सेक्टर २० अंतर्गत येते. या संपूर्ण प्रकर व्हिडिओमध्ये कैद करण्यात आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता भाजपच्या या प्रकरणा बद्दल निवडणूक आयोग कशा प्रकारे कारवाई करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. या जेवणाच्या पॅकेटवर नमो फूड असे लिहिलेले आहे.

भाजपचे उमेदवार डॉ. महेश शर्मा यांच्या मतदारसंघातील हा संपूर्ण प्रकार झाला आहे. शर्मा हे मतदान केंद्रात जाण्यापूर्वी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. गेल्या काही दिवसांपासून भाजप कोणकोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. झी वाहिनीवर आचारसंहितेचे सारे नियम धाब्यावर बसवत मालिकांच्या माध्यमातून भाजपचा प्रचार सुरू होता. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून पॉलिटीकल पार्टीच्या स्कीम्स प्रमोट करण्यात येत होत्या. यावर निवडणूक आयोगानने आपला आक्षेप नोंदवत कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत आज झी वाहिनीच्या कार्यक्रमांचे प्रसारण ८ ते १० वेळेत बंद राहणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अहमदनगरच्या जागेसाठी सुजय विखे पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?

News Desk

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे सरकारची सहानुभूती नाही! – जयंत पाटील

Aprna

उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांची कथित ऑडिओ क्लिप जाहीर सभेत सादर

News Desk