HW News Marathi
राजकारण

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपची माघार; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली घोषणा

मुंबई | “या निवडणुकीत सौ. ऋतुजा लटके आहेत. त्या निवडून याव्यात त्यांच्या समर्थात आम्ही भाजच्या उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत आहोत”, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर  बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक (Andheri East Assembly By-Election) बिनविरोध व्हावी, असे आवाहन केले होते. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज (17 ऑक्टोबर) महत्वाची बैठक पार पडली. या बैठक पार पडल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेत अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली. यामुळे भाजपच्या मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार पत्नी ऋतुजा लटके यांचा विजयचा मार्ग मोकळा झाला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले, “या निवडणुकीत सौ. लटके आहेत. त्या निवडून याव्यात त्यांच्या समर्थात आम्ही भाजच्या उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत आहोत. भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि आरपीआय रामदास आठवले  या युतीचा जो उमेदवार मुरजी पटेल हे कमल चिन्हावर निवडणूक लढवित होते. या पोटनिवडणूक लढवण्यासाठी आम्ही अर्ज देखील भरला आहे. परंतु, आज असा निर्णय घेतला आहे की, आमच्या केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वांनी आज आमचा उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेत आहोत.

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक आम्ही 100 टक्के जिंकणार होतो, पण…

महापालिकेपूर्वीची पहिली निवडणूक होती, आणि या निवडणूक भाजपने सर्व ताकद लावली होती, मग हा निर्णय का?, घेतला, असा प्रश्न पत्रकारांनी बावनकुळेंना विचारल्यावर ते म्हणाले, “51 टक्केची लढाई आम्ही जिंकली आहे. आणि आम्ही ही निवडणूक जिंकलोच असतो. या निवडणुकीसाठी आमची संपूर्ण तयारी झालेली आहे. आम्ही रिणागंणामध्ये आहोत. आणि या निवडणुकीत आमच्या वॉर्डमध्ये आम्हाला मतेही मिळणारच आहेत. आणि ते मिळणारच होते. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात ही निवडणूक आम्ही 100 टक्के जिंकणार होतो. यासाधारण 1 वर्ष पुढच्या निवडणुकीला आहे. एक-दीड वर्षा करता लोकसभा आणि विधानसभा या सर्व निवडणुका आहेत. यापूर्वी महाराष्ट्राचे अनेक उदाहरण घेतले. भाजपने अनेक वेळा हा निर्णय घेतला आहे. एखाद्या वेळी जेव्हा कोणाचे निधन होते. एखाद्या आमदार किंवा खासदारांचे निधन होते. आणि त्यांच्या कुटुंबियांतील त्यांची पत्नी किंवा मुलगा निवडणूक लढवणार असेल. तर आमची संस्कृती आहे. भाजप त्यांचा उमेवार देत नाही.

 

शरद पवार आणि राज ठाकरेंची अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची केले आवाहन

अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन केले. त्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. “भाजपने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील (Andheri East by-election) आपला उमेदवार मागे घ्यावा. आणि भाजपने ही निवडणूक लढवू नये,” असे पत्रता लिहिले होते. यानंतर आता अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे माघार घेणार का? यावर चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंदेर फडणवीस यांची महत्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर मुरजी पटेल माघार घेणार की निवडणूक लढवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात दिग्गज नेते शरद पवार आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन भाजपला केले आहे. दरम्यान, रविवारी रात्री शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी पत्र लिहिले होते.

 

 

 

 

Related posts

राहुल गांधींवर मानहानीचा दावा

Gauri Tilekar

पेट्रोल डिझेल दरवाढ प्रश्नावर जनतेच्या भावना दुखाविण्याचा हेतू नव्हता | आठवले

News Desk

अमेठीपेक्षा इटलीतील लहान मुलांना शिव्‍या शिकवा !

News Desk