HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

वर्षभरापूर्वी काश्मीरमध्ये सरकार चालवत होतात ते कोणत्या देशात ?

मुंबई | कॉंग्रेस आघाडीचा संयुक्त जाहिरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे. आमचा जाहीरनामा तयार होता परंतु घटक पक्षांनी आग्रह केल्यामुळे एकत्रितपणेच जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे आज जाहिरनामा जाहीर करण्यात येत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज (२३ सप्टेंबर) स्पष्ट केले आहे. “आमच्या आघाडीच्या जागा वाटप झाल्या आहेत. १२५ – १२५ जागा लढवण्याचे निश्चित झाले आहे. अजून काही पक्ष आमच्यासोबत येणार आहे. त्यांच्या जागा वाटप लवकरच होईल”, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

नवाब मलिक यांनी यावेळी भाजपवर टीका देखील केली आहे. “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत पवारसाहेबांबद्दल वक्तव्य केले आहे.परंतु त्यांनी कलम ३७० वरुन जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु केले आहे”, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. “मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले होते. काश्मीर आता दिल्याबद्दल. वर्षभरापूर्वी मेहबूबा मुफ्ती सोबत सरकार चालवत होतात. ते कोणत्या देशात ?” असा खोचक सवालही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

“काश्मीरमध्ये तिरंगा फडकविण्यात आला आहे. पहिल्यापासून फडकत आहे. दोन झेंडे होते ही वस्तुस्थिती आहे.आरएसएसच्या कार्यालयावर कधी तिरंगा फडकवला गेला नाही. आम्ही आंदोलने केल्यावर फडकवला गेला आहे. त्याचे उत्तर पहिल्यांदा द्यावे”, असेही नवाब मलिक यांनी केला आहे. “काश्मीरमध्ये ७० दिवसात एकही गोळी चालली नाही असे अमित शहा बोलत आहेत मग अद्याप काश्मीरमधील कर्फ्यू का काढण्यात आला नाही ?”, असा सवाल नवाब मलिक यांनी यावेळी उपस्थित केला.

Related posts

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उपमुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

News Desk

राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत वाढला लॉकडाऊन

News Desk

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल

News Desk