May 24, 2019
HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

देशाने ‘नरेंद्र मोदी प्रयोग’ स्वीकारला आहे !

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ५ वर्षात प्रथमच शुक्रवारी (१७ मे) पत्रकार परिषद घेतली आहे. ‘लोकसभा निवडणूक २०१९’च्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीचा प्रचार अवधी संपताच पंतप्रधान मोदींनी त्यांच्या या कार्यकाळातील पहिली पत्रकार परिषद घेतली आहे. “देशात असे पहिल्यांदाच होणार आहे कि, आमचे सरकार दुसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सत्तेवर येणार आहे”, असा विश्वास यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. तर काँग्रेसने व्होटबँकसाठी हिंदू दहशतवादाचा मुद्दा आपला अजेंडा बनविल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे. “देशाने ‘नरेंद्र मोदी प्रयोग’ स्वीकारला आहे”, असा दावा देखील शाह यांनी यावेळी केला आहे. दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींनी पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. “मोदींनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक नाही”, असे म्हणत अमित शाह यांनी याबाबत स्पष्टीकरण देखील दिले.

भाजपच्या पत्रकार परिषदेत अमित शाह यांनी मांडलेले मुद्दे
 • काँग्रेसचा अजेंडा म्हणजे हिंदू दहशतवाद
 • व्होटबँकेसाठी हिंदू दहशतवादाचे षडयंत्र रचले
 • देशाने ‘नरेंद्र मोदी प्रयोग’ स्वीकारला
 • संरक्षणमंत्र्यांनी सर्व आरोपांना संसदेत उत्तरे दिली आहेत
 • राहुल गांधींकडे पुरावा होता तर न्यायालयात सादर करायचा होता. राजकीय आरोप करून काहीही उपयोग होणार नाही.
 • आमच्या विचारांना साथ देणाऱ्या पक्षाचे एनडीएत स्वागत असेल.
 • वादग्रस्त वक्तव्यांप्रकरणी नेत्यांवर पक्षाकडून योग्य ती कारवाई केली जाईल.
 • प्रसारमाध्यमांनी ममतादीदींना हिंसाचाराचा जाब विचारायला हवा.
 • गेल्या दीड वर्षात पश्चिम बंगालमध्ये भाजपचे ८० कार्यकर्त्यांची हत्या झाली.
 • विरोधकांच्या चुकीच्या प्रचारामुळे आमचाच फायदा.
 • महागाई आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा नसलेली पहिली निवडणूक.
 • गेल्या ५ वर्षांमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेत वाढ झाली.
 • सत्तेत आल्यापासून १३३ योजना लागू केल्या.
 • २०१९ ला २०१४ पेक्षा मोठा विजय मिळेल.
 • आमच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या.

Related posts

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणार, दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

News Desk

#MarathaReservation : आरक्षणाआधीच भाजपला श्रेय लाटण्याची घाई

News Desk

राजीव गांधी यांच्यामुळेच मी आज जिवंत | अटलबिहारी वाजपेयी

News Desk