HW Marathi
राजकारण

मंदिर-मस्जिद यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या तिजोरीवरच सरकार हात मारतेय !

मुंबई | मंदिर-मस्जिद यांना मदत देण्याची सरकारची प्रथा असताना ही प्रथा मोडीत काढत सरकार त्यांच्या तिजोरीवरच हात मारण्याचे काम करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. राज्याच्या तिजोरीतून मंदिर, मस्जिद आणि दर्गा यांना मदत देण्याची प्रथा पूर्वीपासून होती. मात्र या सरकारचा कारभार अजब आहे. सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना साई संस्थानाच्या तिजोरीवर हात मारत आहेत. आणि उलट परिस्थिती निर्माण करत आहेत असेही यावेळी नवाब मलिक म्हणाले.

सातवा वेतन आयोग देताना ही सगळी परिस्थिती पाहिली तर ५ लाख कोटीचे कर्ज या राज्यावर आहे. चार वर्षात राज्याची तिजोरी रिकामी करण्याचे काम राज्याला कर्जबाजारी करण्याचे काम सरकारच्या माध्यमातून झाले आहे. त्यामुळे सातव्या वेतन आयोगासाठी पैसे सरकार कसे निर्माण करणार आहे. याबाबत लोकांच्या मनात शंका आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

विकास कामे करताना लोकांना सांगत आहे अडीच लाख कोटीचे कर्ज घेतले आहे. अडीच लाख कोटीचे कर्ज घेवून जी मेट्रोची कामे केली जात आहेत, ती विशेष ठेकेदारांना देवून टक्केवारी घ्यायची आणि काळया यादीतील ठेकेदाराला काम देवून काम करुन घेणे म्हणजे मोठा भ्रष्टाचार करण्याचा उदयोग सरकारच्या माध्यमातून सुरू आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…सोलापूर मतदारसंघाबाबत

News Desk

राष्ट्रवादीकडून स्मृती इराणींच्या राजीनाम्याची मागणी

Gauri Tilekar

आमच्या घरातून केवळ मीच निवडणूक लढवणार | सुप्रिया सुळे

News Desk