HW News Marathi
राजकारण

INX Media Case: पी. चिदंबरम यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

नवी दिल्ली | आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज (२६ ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिल्ली उच्च न्यायालायने चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकपूर्व जामीन देणास नकार दिला होता. या प्रकरणी गेल्या गुरुवारी (२२ ऑगस्ट) सीबीआय न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली होती. सीबीआयने गेल्या बुधवारी रात्री उशीरा त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती

सीबीआयाने तब्बल ३० तासानंतर चिदंबरम यांना बुधवारी (२१ ऑगस्ट) रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास त्यांच्या जोरबाग येथील निवासस्थानात अटक केली. अटक होण्यापूर्वी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास चिदंबरम नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. अवघ्या सहा मिनिटे चाललेल्या या पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी त्यांच्यावर लावल्याले सर्व आरोप फेटाळून लावले. पत्रकार परिषदेदरम्यान आटोपल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआय अधिकारी पोहोचले होते. परंतु तोपर्यंत परिषद समाप्त करून चिदंबरम जोरबाग येथील निवासस्थानी निघून गेले होते. सीबीआय पथकही पाठोपाठ जोरबागेत दाखल झाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस; विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

Aprna

अनेक वर्षे मतभिन्नता होती, आजही आहे, उद्याही असू शकेल !

News Desk

डिवचायचा प्रयत्न होणार पण तुम्ही शांत रहा !

News Desk