HW News Marathi
राजकारण

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर राज्यातील राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ विचारवंतांनी फेसबुकवर मांडली भूमिका

मुंबई | भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Assembly By-Election) माघार घेण्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेने नामंजूर केला. आणि हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले. यानंतर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पालिकेने ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर केला. यानंतर ऋतुजा लटकेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु, या दरम्यानच्या काळातील राज्याचे राजकारणा चांगलेच पेटले होते.  भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीत माघार घेतल्यानंतर राज्यातील अनेक राजकीय विश्लेषकांनी तुळशीदास भोईटे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी आणि मराठी संगीतकार कुशल उनामदार आपली भूमिका मांडली आहे.

ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक तुळशीदास भोईटे यांनी फेसबुकवर पोस्ट करत अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपच्या माघावर म्हणाले, “#अंधेरी मतदार संघातील लढाई ५०-५० टक्के होती. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचा बालेकिल्ला असणारी ही जागा आंदण दिल्याने ठाकरेंच्या शिवसेनेची शक्यता वाढलीच होती. राजीनाम्याबद्दल जे काही घडवलं गेलं, त्यानं भाजपाचं बरंच काही बिघडलं. मुंबई मनपाच्या महत्वाच्या निवडणुकीआधी असा पराभव भाजपाला मुळीच परवडणारा नव्हताच. माघार ही प्रत्यक्षात भाजपाच्या हिताचीच! भाजपाविरोधात लढल्यानं शिवसेनेला होऊ शकणारा जास्तीचा फायदा मात्र हुकला!”

ज्येष्ठ विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी राज्याचा सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाषण करत फेसबुकवर पोस्ट केले आहे. यावर डॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले, “लढून मरण्यापेक्षा पळून वाचलेले बरे….! मुरजी पटेल नव्हे, भाजपाच्या पिछेहाटीची सुरूवात झाली आहे. हवा पूर्णतः बदलली आहे. पक्षनेते उद्धव ठाकरे आणि खऱ्या सेनेचं अभिनंदन.”

यावर मराठी संगीतकार कुशल इनामदार यांनी त्यांच्या फेसबुक अंकाऊटवर पोस्ट करत एक गंमतीदार किस्सा सांगितला आहे. कुशल इनामदार म्हणाले, “छगन भुजबळांच्या पंचाहत्तरी निमित्त एकदम सहज आठवलं. काही वर्षांपूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई नाशिक रस्त्यावर शुभेच्छासंदेशाचा भला मोठा बॅनर लागला होता आणि त्यावर लिहिलं होतं – “जीवेत् छगन: शतम!” शरदरावांच्या वाढदिवसाला “जीवेत् शरद: शतम्।” ही पाटी पाहून उत्साही कार्यकर्त्यांनी केलेली उपज असावी. असे निष्ठावंत कार्यकर्ते माता सरस्वती सगळ्यांना देवो!”

 

Related posts

शिवसेनेच्या सर्व आमदार-खासदारांची उद्या तातडीची बैठक

Gauri Tilekar

…अन् विखे-पाटलांनी विचारले कुठले बटण दाबू …?

News Desk

राज ठाकरे यांनी कट-पेस्ट करुन लोकांची दिशाभूल करु नये !

News Desk