नवी दिल्ली | “देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय नौदलाच्या विराट नौकेचा वापर आपल्या कुटुंबाच्या खासगी सुट्यांसाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केला होता,” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा राजीव गांधीवरून काँग्रेसवर टीका केली. यानंतर काँग्रेसच्या सोशल मीडिया विभाग साभाळणाऱ्या दिव्या स्पंदना मोदींना प्रयुत्तर देत म्हटले की, मोदी कॅनडियन नागरिकत्व असणाऱ्या अभिनेता अक्षय कुमारच्या परिवारासोबत युद्ध नौका आयएनएस सुमित्रावर घेऊन गेले होते. हे बरोबर आहे का? असा सवालदेखील केला ते कसे काय चालले, असा सवाल स्पंदना यांनी उपस्थित केला. यासोबतच त्यांनी सबसे बडा झूठा मोदी, असा हॅशटॅग वापरला आहे.
Yeh teek tha? @narendramodi you took a Canadian citizen @akshaykumar with you on-board INS Sumitra. #SabseBadaJhootaModi
Here’s the link to the article, most of us have not forgotten this controversy : https://t.co/jrPNUvk2Py pic.twitter.com/SWkl78rA4F— Divya Spandana/Ramya (@divyaspandana) May 9, 2019
टेलिग्राफ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारी २०१६ रोजी आयएनएस सुमित्रा युद्धनौकेवर नरेंद्र मोदी आणि अक्षय कुमारच्या मुलासोबत मौजमस्ती करत असलेला एक फोटो व्हायरल होत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील एका फोटो ट्विट केला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर आरोप, पण नरेंद्र मोदी स्वतः मात्र अभिनेता अक्षय कुमार आणि त्याच्या कुटुंबियांना घेऊन आयएनएस सुमित्रा युद्धनौकेवर गेले होते. काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेसने देखील मोदींच्या या कृत्य देशासाठी धोकादायक नव्हते का? असा सवालदेखील उपस्थित केला आहे.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर आरोप करणारे @narendramodi स्वतः मात्र अभिनेते @akshaykumar आणि त्याच्या कुटुंबियांना घेऊन #INSsumitra या युद्धनौकेवर गेले होते. @livemint वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. मोदींचे हे कृत्य देशासाठी धोकादायक नव्हते का?https://t.co/5kVAMehVRl pic.twitter.com/pKe9Dp52QC
— NCP (@NCPspeaks) May 10, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.