HW News Marathi
राजकारण

दिल्लीत कोन बनेगा करोडपती’सारखे पुन्हा ‘कोन करेगा छत्रपती का अपमान’ची स्पर्धा! – संजय राऊत

मुंबई | “खोके सरकारमध्ये स्पर्धा लागलेले का? कोण सगळ्यात जास्त छत्रपतींचा अपमान करेल. आणि त्याला काही मोठे बक्षीस वगैरे लावलय का? दिल्लीने कोन ‘बनेगा करोपती’सारखे ‘कोन करेगा छत्रपती का अपमान’ असच दिसतय”, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे. राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी बुधवारी (30 नोव्हेंबर) साताऱ्या प्रतापगडावरील शिवप्रताप दिना निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंसोबत केलेले बंडांची तुलना ही शिवाजी महाराजांची औरंगजेबाच्या आग्य्रातील सुटकेशी केलेला होती. लोढांच्या राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले होते. या पार्श्वभूमीवर राऊतांनी आज (1 डिसेंबर) माध्यमांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

लोढांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात आंदोलन आणि विरोध प्रदर्शन सुरू आहे, असा सवाल पत्रकारांनी राऊतांना केल्यावर ते म्हणाले, “भाजपच्या एका पक्षाच्या नेत्यांने सुशांधू त्रिवेदींनी छत्रपतींना माफीवीर ठरविले. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज हे नायकच नाहीत. जुने झाले सांगितले आणि आता छत्रपतींना आता ऐका बेईमान व्यक्तीशी तुलना करून महाराष्ट्राचा परत एकदा अपमान केलेला आहे. प्रश्न इतकाच आहे की, हे जे सरकार आहे. जे खोके सरकार म्हणून कुख्याद झालेले आहे. त्या सरकारमध्ये स्पर्धा लागलेले का? कोण सगळ्यात जास्त छत्रपतींचा अपमान करेल. आणि त्याला काही मोठे बक्षीस वगैरे लावलय का? दिल्लीने कोण ‘बनेगा करोपती’सारखे ‘कोण करेगा छत्रपती का अपमान’ असच दिसतय. जो उटतोय तो रोज त्यांचा प्रमुख माणूस छत्रपतींचा अपमान करतोय. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचे खोके आमदार जे स्वाभिमान, इतिहास, अभिमान आणि हिंदुत्व या मुद्द्यावर शिवसेना सोडून गेले. मग छत्रपतींचा अपमान हा हिंदुत्वाचा अपमान नाही. छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही. छत्रपतींची आग्राची सुटका ही बेईमान बंडखोरांशी करत असला, तर त्याला तुम्ही पहात राहाल. त्या पद्धतीने उत्तर लवकरच दिले जाईल”, असा इशाराही त्यांनी शिंदे सरकारला माध्यमांशी बोलताना दिला आहे.

राज्याच्या पर्यटनमंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती हवा 

“मंगलप्रभात लोढा हे महाराष्ट्राचे मंत्री आहेत. मुंबईचे पालकमंत्री आहेत. एक उद्योजक आहेत. पर्यटन मंत्री आहेत. निदान या राज्याच्या पर्यटन मंत्र्याला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहित पाहिजे. कारण, या महाराष्ट्रात जगभरातून जे पर्यटन येतात. ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहायला येतात. त्यांचे किल्ले पाहायला येतात. किंवा आग्य्रा किल्ला जे पर्यटन  जातात. ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा इकडचा संघर्ष समजून घ्याला जातात. अशा वेळाला महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासंदर्भात चुकीचे विधान करून त्यांची तुलना एका पक्षाशी राज्याशी बेईमानी करणाऱ्या व्यक्ती बरोबर करत आहेत”, अशी टीका राऊतांनी केली आहे.

राज्यातील जनता शिवसेनेची आणि नेत्यांची वाट पाहातात

राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातील जनता ही शिवसेनेच्या नेत्यांची आणि शिवसेनेची वाट पाहाते. आणि शिवसेना ही जागेवरच आहे. आमचे 40 खोके जरी गेले असले. खोके आमदार तरी शिवप्रेमी आणि शिवसेनेची जनता ही जागेवरच आहे. ती शिवसेनेच्या पाठिशी आहे. आम्ही संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहे. आणि यांची सुरुवात ही नाशिकपासून होणार आहे, अशी माहिती राऊतांनी माध्यमांशी बोलताना दिली.

 

Related posts

भाजपकडे कोणती तरी वॉशिंग पावडर आहे म्हणूनच… !

Gauri Tilekar

गोव्यात काँग्रेस आमदारांकडून सरकार स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर 

News Desk

मुस्लिम समाजाने आता वाघ व्हावे !

News Desk