HW News Marathi
राजकारण

इसिसचा धोका वाढत असल्याचा हा इशारा !

मुंबई | मुंब्रा, संभाजीनगर येथून ज्या नऊ जणांना ताब्यात घेतले आहे ते सर्व ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेशी संबंधित आहेत. ही संघटना म्हणजे ‘इसिस’चेच अपत्य आहे. ती इसिससाठी ‘स्लीपर सेल’चे काम करते आणि या माध्यमातून तरुणांना दहशतवादाचे शिक्षण देते असा तपास यंत्रणांचा दावा आहे. ठाणे जिल्हय़ात बिळे खणण्याचा इसिसचा प्रयत्न थांबलेला नाही असा मुंब्रा येथील अटकसत्राचा दुसरा अर्थ आहे. या अटका वेळीच झाल्या. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली हे चांगलेच आहे. इसिसचा धोका वाढत असल्याचा हा इशारा आहे हे लक्षात घ्यायला हवे, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून इसिस देशासाठी किती धोकादायक असल्याचा प्रयत्न केला आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

मुंब्रा, संभाजीनगर येथून ज्या नऊ जणांना ताब्यात घेतले आहे ते सर्व ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेशी संबंधित आहेत. ही संघटना इसिससाठी ‘स्लीपर सेल’चे काम करते. या माध्यमातून तरुणांना दहशतवादाचे शिक्षण देते असा तपास यंत्रणांचा दावा आहे. ठाणे जिल्हय़ात बिळे खणण्याचा इसिसचा प्रयत्न थांबलेला नाही असा मुंब्रा येथील अटकसत्राचा दुसरा अर्थ आहे. या अटका वेळीच झाल्या. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली हे चांगलेच आहे. इसिसचा धोका वाढत असल्याचा हा इशारा आहे हे लक्षात घ्यायला हवे.

प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशात हमखास संशयित दहशतवाद्यांना अटक होते. छापे मारले जातात. एखादा मोठा कट उधळला जातो. आताही प्रजासत्ताक दिन तोंडावर आला असताना दहशतवादविरोधी पथकाने मुंब्रा, संभाजीनगर येथे काही ठिकाणी छापे मारले आणि नऊ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. या सर्वांचा ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आहे. मुंब्रा येथील कौसा भागात मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. संभाजीनगर येथेही काही अटका झाल्या. हे सर्वच संशयित दहशतवादी सुशिक्षित आहेत आणि संगणक, माहिती-तंत्रज्ञान यात ते तज्ञ आहेत असे सांगण्यात येत आहे. अलीकडील काळात आपल्या देशात सुशिक्षित संशयित दहशतवादी पकडले जाण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः संगणकीय तंत्रज्ञानात पारंगत असणाऱयांचा वावर दहशतवादी कारवायांत वाढताना दिसत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने गेल्या काही दिवसांत ज्यांना ताब्यात घेतले त्यात सुशिक्षित तरुणांचा भरणा जास्त आहे. उच्चशिक्षित मुस्लिम तरुण-तरुणींना धर्माच्या, जिहादच्या नावाने भडकवायचे, त्यांचे ब्रेन वॉशिंग करून ‘जिहादी’ बनवायचे आणि दहशतवादी कारवायांत ओढायचे ही ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेची जुनीच मोडस् ऑपरेंडी आहे. दोन वर्षांपूर्वी पुण्यातील

एका अल्पवयीन मुलीचा

असाच किस्सा बाहेर आला होता. मानसोपचारतज्ञांकडून तिचे नंतर कौन्सिलिंग करण्यात आले. कल्याणमधील चार तरुणदेखील इसिसमध्ये सहभागी झाले होते. तीन वर्षांपूर्वी या प्रकरणाने देशभरातच खळबळ माजवली होती. ठाणे जिल्हय़ाशिवाय मराठवाडय़ातही इसिसने हातपाय पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वी येथे ‘सिमी’चे जाळे होते. आता ‘इसिस’ तोच प्रयत्न करीत आहे. मराठवाडय़ातील परभणी येथून तीन वर्षांपूर्वी नासीर याला ‘एटीएस’ने अटक केली होती. त्याशिवाय शाहीद खान हा तरुणही एक किलो स्फोटकासह एटीएसच्या जाळय़ात सापडला होता. या दोघांवरही इसिसशी संबंध असल्याचा संशय होता. रिझवान खान याला कल्याण येथून ताब्यात घेण्यात आले होते. तो ठाणे जिल्हय़ात इसिसचे ‘भरती केंद्र’ चालवीत असल्याचा संशय होता. ठाणे जिल्हा आणि इसिस हे कनेक्शन नवीन नाही, जुनेच आहे. किंबहुना, मंगळवारी ज्या अटका मुंब्रा, कौसा येथून झाल्या त्याचे मूळ या जुन्या कनेक्शनमध्येच आहे. इसिसला देशात फार समर्थन मिळणार नाही, येथील मुस्लिम तरुण या दहशतवादी संघटनेकडे मोठय़ा प्रमाणात आकर्षित होणार नाहीत असे सरकारपासून सर्वच सांगत होते. मात्र तो अंदाज पूर्ण खरा ठरलेला नाही असेच

एकंदर चित्र

दिसत आहे. महाराष्ट्रातून ‘इसिस’मध्ये मोठय़ा प्रमाणावर मुस्लिम तरुण गेले नसले तरी हे कनेक्शन पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले नाही. महाराष्ट्र एटीएसच्याच म्हणण्यानुसार त्यांनी किमान 86 तरुणांना इसिसमध्ये जाण्यापासून परावृत्त केले आहे. ही संख्याही तशी लक्षणीयच आहे. ही मुले तिकडे गेली नाहीत हे आपल्या यंत्रणांचे यशच आहे, पण हिंदुस्थानी मुस्लिम तरुणांमधील ‘इसिस’चे आकर्षण संपलेले नाही हेच मुंब्रा, कौसा, संभाजीनगर येथील एटीएसच्या अटकसत्रांमुळे दिसून आले आहे. मध्यंतरी राष्ट्रीय तपास यंत्रणेनेही उत्तर प्रदेश, दिल्ली येथे छापे टाकून ‘इसिस’शी संबंधित संशयितांना अटक केली होती. मुंब्रा, संभाजीनगर येथून ज्या नऊ जणांना ताब्यात घेतले आहे ते सर्व ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेशी संबंधित आहेत. ही संघटना म्हणजे ‘इसिस’चेच अपत्य आहे. ती इसिससाठी ‘स्लीपर सेल’चे काम करते आणि या माध्यमातून तरुणांना दहशतवादाचे शिक्षण देते असा तपास यंत्रणांचा दावा आहे. ठाणे जिल्हय़ात बिळे खणण्याचा इसिसचा प्रयत्न थांबलेला नाही असा मुंब्रा येथील अटकसत्राचा दुसरा अर्थ आहे. या अटका वेळीच झाल्या. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली हे चांगलेच आहे. इसिसचा धोका वाढत असल्याचा हा इशारा आहे हे लक्षात घ्यायला हवे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२०११ पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करण्याच्या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा !

Gauri Tilekar

काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

Aprna

शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांनाही पटकून टाका !

News Desk