HW News Marathi
राजकारण

‘ते’ साध्वी प्रज्ञाचे वैयक्तिक मत, पक्षाचा काहीही संबंध नाही !

नवी दिल्ली | “साध्वी प्रज्ञा सिंह यांनी हेमंत करकरे यांच्याविषयी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयाक्तिक मत आहे. त्यांच्या या वक्तव्याशी पक्षाचा काहीही संबंध नाही”, असे म्हणत भाजपने या प्रकरणात आपले हात वर केले आहेत. भाजपने एक पत्रक काढून आपली याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरने अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. संपूर्ण देशभरातील सर्वच स्तरातून साध्वी प्रज्ञा सिंहच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

अवघ्या २ दिवसांपूर्वी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरने भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच भाजपकडून लगेचच भोपाळमधून उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली. साध्वी प्रज्ञा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी तुरुंगात असताना त्यांच्यासोबत झालेल्या छळाबाबत बोलताना एका जाहीर सभेदरम्यान बोलताना साध्वी प्रज्ञाची जीभ घसरली. दरम्यान, या प्रकरणी भाजप आपली बाजू सुरक्षित करू पाहत आहे. “हेमंत करकरे हे दहशतवाद्यांसोबत लढताना शहीद झाले आहेत. भाजपने करकरे यांना नेहमीच शहीद मानले आहे”, साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. अनेक वर्षांपासून झालेला शारीरिक आणि मानसिक छळामुळे त्यांनी हे वक्तव्य केले असे”, असे भाजपने यात म्हटले आहे.

“हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने अडकवले. मी त्यांना म्हटलेच होते की, तुमचा सर्वनाश होईल. शेवटी ते दहशतवाद्यांकडून मारले गेलेच. त्यांचा मृत्यू त्यांच्या स्वत:च्या कर्मानेच झाला,” असे संतापजनक वक्तव्य प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते. प्रज्ञा सिंह ठाकूरच्या या वक्तव्यानंतर भाजपला सर्वच स्तरातील लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या उमेदवारीवरून देखील आता वाद पेटू लागला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हे पेट्रोलचे नाव बदलायलाही मागेपुढे पाहणार नाहीत !

News Desk

मी माझ्या घरातील मुलांचे बालहट्ट पुरवणार, दुसऱ्यांचे कशाला!

News Desk

मोदींच्या केदारनाथ यात्रेमुळे आचारसंहितेचे उल्लंघन टीएमसीची आयोगाकडे तक्रार

News Desk