हैदराबाद | लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या टप्प्यातील आज (११ एप्रिल) सुरुवात झाली आहे. देशभरात पहिल्या टप्प्यात २० राज्यात ९१ जागांसाठी मतदान सुरू आहे. देशभरात मतदान मोठ्या उत्साहात सुरू असताना मात्र आंध्र प्रदेशातील जनसेना पार्टीच्या विधानसभा उमेदवारीने ईव्हीएम मशीन जमिनीवर आदळली आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी उमेदवाराला अटक केले आहे. आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या २५ जागांसह विधानसभेच्या १७५ जागांसाठी मतदान होत आहे.
#WATCH Jana Sena MLA candidate Madhusudhan Gupta smashes an Electronic Voting Machine (EVM) at a polling booth in Gooty, in Anantapur district. He has been arrested by police. #AndhraPradesh pic.twitter.com/VoAFNdA6Jo
— ANI (@ANI) April 11, 2019
आंध्र प्रदेशमधील जनसेना पक्षाचे विधानसभेचे उमेदवार मधुसुदन गुप्ता यांनी चक्क मतदान केंद्रातील ईव्हीएम मशिनच जमिनीवर आदळली. अनंतापूर जिल्ह्यातील गुटी मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे. ईव्हीएम मशीनच्या सातत्याने बंद पडल्याच्या घटना घडत असल्यामुळे रागात आलेल्या गुप्ता यांनी ईव्हीएम मशीन जमिनीवर आदळली. या प्रकारानंतर पोलिसांनी तात्काळ गुप्ता यांना अटक करण्यात आली. मात्र या प्रकारानंतर मतदान केंद्रात तणावाचे वातावरण निर्माण झाल असून पोलिसांनी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.