HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

जयाप्रदा रामपूरमधून आझम खानविरोधात निवडणूक लढणार

नवी दिल्ली | प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा यांनी समाजवादी पार्टीमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जयाप्रदा यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना अवघ्या काही तासात रामपूरमधून लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. यापूर्वी २००४मध्ये जयाप्रदा रामपूरमधून लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी झाल्या होत्या. सपातील जेष्ठे नेते आजम खान यांच्यासोबत झालेल्या अंतर्गत वादानंतर जयाप्रदा यांनी समाजवादी पार्टीला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

रामपूरमधून समाजवादी पार्टीचे जेष्ठे नेते आझम खान यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. पक्षात असताना दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता या निवडणुकीत दोघांमध्ये नक्की कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. परंतु उत्तर प्रदेशमधल्या रामपूरमध्ये मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येने आहे.

जयाप्रदा यांचा राजकीय परिचय

जयाप्रदा यांनी १९९४मध्ये पहिल्यांदा तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) सहभागी झाल्या होत्या. एनटी रामाराव आजारी असल्याने पक्षाचे नेतृत्व चंद्राबाबू नायडूंकडे गेले आणि जया प्रदाने बंडखोरी केली. चंद्राबाबू नायडूंबरोबर त्यांचे फार काळ जमले नाही. त्यानंतर त्या समाजवादी पक्षात सामील झाल्या आणि रामपूर लोकसभा निवडणूक लढवली. २००४च्या निवडणुकीत त्यांनी ८५ हजार मतांनी विजय मिळवला. २००९लाही त्या ३० हजार मतांनी विजयी झाल्या.

 

Related posts

विधिमंडळातील राजदंड मतदारसंघात नेण्यासाठी मला परवानगी द्या !

News Desk

#LokSabhaElections2019 : भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, मोदी वाराणसीतून लढणार

News Desk

#LokSabhaElections2019 : विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट न देण्याचा भाजपचा निर्णय

News Desk