HW News Marathi
राजकारण

जयदत्त क्षीरसागर करणार आज शिवसेनेत प्रवेश

मुंबई | बीड जिल्हयाच्या राजकारणात दोन पिढ्यांचा दबदबा असणारे क्षीरसागर कुटुंब आता अंतर्गत वादाने घेरले आहे. अशा परिस्थितीत जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा कालावधी बाकी असतानाच जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (२२ मे) ते शिवसेनेत प्रवेश करतील. ‘मातोश्री’वर छोटेखानी स्वरूपात हा कार्यक्रम पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल अगदी उद्यावर येऊन ठेपलेले असताना जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस-टीडीपी खिसेकापणाऱ्या जमातीचा पक्ष !

News Desk

अजित पवार यांचे सामनाच्या अग्रलेखाला प्रत्युत्तर

News Desk

पक्षातील ‘गद्दारांना’ शोधा, ममता बॅनर्जींचा आदेश

News Desk