HW News Marathi
राजकारण

काकांना उमेदवारी द्या, मग मी भाजप सोडतो !

श्रीगोंदा | अरुण काकांना उमेदवरी दिली तर भाजपच्या आमदारकी पदाचा राजीनामा देऊन त्यांच्यासोबत मैदानात उतरणे असे विधान राहुरी विधानसभा मतदारासंघाचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले आहे. पुढे असे देखील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलतात एक आणि करतात वेगळीच करतात त्यांच्या या गोष्टीपासून सर्वजण परिचय आहेत.

कर्डिल हे कुकडी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन प्रसंगी बोलत होते. त्यावेळी ते असे दखील म्हणाले की, व्यासपीठावर मी एकटाच भाजपचा असून आमच्या सरकारने शेतकऱ्यांना सर्वात जादा मदत केली होती. बोंड अळीसाठी ३५ कोटीचे शेतकऱ्यांना मदत केला, त्यामुळे भाजपाचे केंद्रात आणि राज्यात सरकार येणार असल्याचा विश्वासही कर्डिलेंनी मत व्यक्त केला आहे. यावेळी कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, हरिदास शिर्के उपस्थित होते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आंध्रची विधानसभा स्टॅच्यू ऑफ युनिटीला टक्कर देणार का?

News Desk

आज त्यावर फक्त शिक्कामोर्तब होईल इतकेच!

News Desk

रिझर्व्ह बँकेच्या कामात केंद्राने हस्तक्षेप केलेला चालणार नाही !

News Desk
मुंबई

धारावी पुनर्विकास प्रकल्पात आता राज्य सरकारचा सहभाग

Gauri Tilekar

मुंबई | धारावी पुनर्विकास प्रकल्पाच भागीदारीत करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून काल (मंगळवार) झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या पुनर्विकास प्रकल्पात मुख्य कंपनी ८० टक्के गुंतवणूक करणार असून राज्य सरकारचे २० टक्के समभाग असलेली विशेष कंपनी (एसपीव्ही) अशी भागीदारी करून या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. हा प्रकल्पासाठी २६ हजार कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी ६०० कोटी रुपये इतका वाटा उचलणार असल्याची मान्यता दिली आहे.

धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी २००७ ते २०११ तसेच २०१६ मध्ये दोन वेळा जागतिक निविदा काढण्यात आल्या होत्या. तर पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र त्यावेळी गुंतवणूकदारांनी या प्रकल्पात गुंतवणूक करण्यास फारसा रस दाखवला नव्हता. राज्य सरकारच्या निर्णयानंतर आता या पुनर्विकास प्रकल्पासाठी पुन्हा एकदा जागतिक निविदा काढली जाणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पानुसार पाच कोटी चौरस फूट एवढी विक्रीयोग्य जागा मिळणार आहे.

धारावीच्या या पुनर्विकास प्रकल्पाला विशेष प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. या मोठ्या प्रकल्पात गुंतवणूकदारांनी या प्रकल्पात गुंतवणूक करावी यासाठी त्यांचा विश्वास संपादन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारने या प्रकल्पात थेट सहभाग घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. या बाबीचा विचार करून हा भागीदारीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.

 

Related posts

१ एप्रिलपासून म्हशीचे दूध प्रतिलीटर २ रुपयांनी महागणार

News Desk

मुंबईच्या हवेची गुणवत्ता पातळी दिल्ली सारखीच

Aprna