HW News Marathi
राजकारण

कन्हैय्या कुमार उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

नवी दिल्ली | जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, कन्हैय्या कुमार २०१९च्या लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. कन्हैया कुमार बिहारमधील बेगुसराय लोकसभा मतदारसंघातून आपली पहिली लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

बिहारमधील बेगुलसराय या लोकसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व लक्षणीय आहे. कन्हैय्या कुमार हे काँग्रेस, राजद आणि डाव्या संघटना या महाआघाडीचा उमेदवार असणार आहेत. लालू प्रसाद यादव यांच्याकडूनही त्यांना समर्थन मिळाल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे या लोकसभा निवडणुकीत बेगुसरायमधून कन्हैय्या कुमार यांना सर्व डाव्या संघटनांचा मोठा पाठिंबा मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अजूनपर्यंत याबाबत कन्हैया कुमार यांच्याकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काँग्रेसकडून ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’ या पुस्तिकेचे प्रकाशन

News Desk

सेक्सिस्ट कॉमेंट्स करणाऱ्यांना राजकारणात स्थान नाही !

News Desk

अॅफर्मेटिव्ह अॅक्शन कायदा करा !

News Desk
देश / विदेश

गुरुग्राम जमीन व्यवहार प्रकरण | वड्रा आणि हुड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Gauri Tilekar

नवी दिल्ली | गुरुग्राम येथील खेडकी दौला जमीन खरेदी प्रकरणात भूपेंद्र सिंह हुड्डा, रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ”निवडणुकांचा काळात, इंधन दरवाढीच्या समस्येवरुन जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी माझा जवळपास एक दशकापूर्वीचा मुद्दा उकरुन काढण्यात आला आहे. यामध्ये नवीन असे काय?”, असे काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांनी म्हटले आहे.

२००८ साली रॉबर्ट वड्रा यांच्या स्काय लाइट हॉस्पिटॅलिटी या कंपनीने ओमकारेश्वर प्रॉपर्टीजकडून खरेदी केलेल्या साडे तीन एकर जमिनीची किंमत साडेसात कोटी रुपये दाखवण्यात आली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. स्काय लाइट हॉस्पिटॅलिटीने गुडगावमधील शिकोहपूर, सिंकदरपूर, खेडकी दौला आणि सिहीमध्ये ७.५ कोटी रुपयांची जमिनी खरेदी व्यवहार केली आणि नंतर याच जमिनीची विक्री 55 कोटी रुपयांमध्ये करण्यात आली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

” वड्रा, हुड्डा, स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी आणि डीएलएफ विरोधात गुरुग्रामच्या खेडकी दौला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरिंदर शर्माने दाखल केलेल्या या तक्रारीत जमिनीच्या खरेदी करारामध्ये अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला आहे,” मानेसरचे पोलीस उपायुक्त राजेश कुमार यांनी अशी माहिती दिली.

Related posts

राज्यसभेत सरकारचा पराभव….

News Desk

पेट्रोल-डिझेल दरवाढ धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका !  

News Desk

परळीतील चक्काजाम आंदोलनादरम्यान खासदार प्रीतम मुंडे पोलिसांच्या ताब्यात

News Desk