HW News Marathi
Karnataka Election 2018 देश / विदेश

मुख्यमंत्री पदाचे दावेदार सिद्धरामय्या चामुंडेश्वरी मतदार संघातून पराभूत

बेंगळुरू | कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार सिद्धरामय्या चामुंडेश्वरी मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. सिद्धरामय्या यांनी चामुंडेश्वर आणि बदामी या दोन मतदार संघातून निवडणूक लढवली आहे. काँग्रेस पक्षाने कर्नाटकात सत्ता मिळवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळे सिद्धरामय्या यांच्यावर मोठी जबाबदारी पडली होती.

दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणारे कर्नाटकातील पहिलेच मुख्यमंत्री नाहीत. या आधी माजी मुख्यमंत्री एच.डी. देवेगौडा यांनी १९८५ साली दोन जागांवर निवडणूक लढवून विजयी झाले होते. मात्र १९८९ साली दोन्ही जागांवर ते पराभूत झाले होते.

कर्नाटक विधान सभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली असून भाजपने शंभरहून अधिक मतदारसंधात आगेकूच केली आहे. तर काँग्रेस ७६ मतदार संघात पुढे आहे. कर्नाटकात किंगमेकर म्हणून पाहिल्या जाणा-या जेडीएसने ३८ मतदार संघात मुसंडी मारली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

असा असणार यंदाचा स्वातंत्र्यदिन !

News Desk

गुलाम नबी आझाद यांचं कौतुक करताना पंतप्रधान झाले भावूक 

News Desk

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने ‘या’मुळे नकारली

Aprna