बेंगळुरू | कर्नाटकातील काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणार ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांना सक्तवसुली संचालनायलाने (ईडी) समन्स जारी केला आहे. यामुळे शिवकुमार आज (३० ऑगस्ट) ईडीच्या दिल्ली कार्यालयात दुपारी १ वाजता हजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
DK Shivakumar, Congress: From the past two years, entire property of my 84-year-old mother has been attached by various investigation authorities as benami property & I am the benami there. Our entire blood has already been sucked. https://t.co/4Ad4atOpzA
— ANI (@ANI) August 30, 2019
शिवकुमार यांनी ईडीच्या चौकशीवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, गेल्या दोन वर्षांपासून माझ्या ८४ वर्षीय आईच्या नावावर असलेली संपूर्ण मालमत्ता तपास यंत्रणांनी बेनामी असल्याचे सांगत जप्त केल्याचा आरोप त्यांनी केला. यापूर्वी गुरुवारी (२८ ऑगस्ट) कर्नाटक उच्च न्यायालयाने शिवकुमार यांची याचिका फेटाळली होती. या याचिकेत शिवकुमार यांनी ईडीचे समन्स फेटाळून लावण्याची मागणी केली होती
शिवकुमार यांच्याविरोधात बेहिशेबी संपत्तीबाबतचे प्रकरण सुरू आहे. गेल्या वर्षी ईडीने शिवकुमार यांच्यासह इतरांवर मनी लाँड्रिंगचे प्रकरण दाखल केले होते. याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित कर चोरी आणि हवाला प्रकरणाच्या आधारे त्यांच्याविरोधात काही प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.