HW Marathi
राजकारण

KarnatakaByElection2018 : कर्नाटकात भाजपचा दारूण पराभव

बेंगळुरु | कर्नाटकातील पोटनिवडणुकीतून जनतेचा कौल आज स्पष्ट झाल्याचे चित्र दिसून आले आहे. तीन लोकसभा आणि दोन विधानसभा जागांपैकी चार जागांवर काँग्रेस- जेडी(एस) युतीने विजय मिळवला आहे. तर भाजपला केवळ शिमोगा लोकसभेची एकच जागा मिळवता आली आहे. तर विधानसभेच्या आणि लोकसभेच्या दोन जागांवर मोठ्या पराभवाला समोरे जावे लागले आहे.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा मानसपुत्र आणि खाण घोटाळ्यातील आरोपी जनार्दन रेड्डी यांच्या बळ्ळारी मतदारसंघात भाजपवर मोठी दारुन पराभव झाला. भाजपचे जनार्दन रेड्डी यांचा बळ्ळारी हा त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. काँग्रेसचे उमेदवार व्हीएस उग्राप्पा यांनी भाजपच्या जे शांता यांच्यावर तब्बल २४३१६१ मतांनी विजय मिळविला आहे

तर मंड्या लोकसभा मतदारसंघात जेडीएसचे उमेदवार एल आर शिवरामोगौडा यांनी भाजपच्या डॉ. सिद्धरामय्या यांचा ३,२४,९४३ मतांनी धुव्वा उडविला.भाजपने शिमोगा लोकसभा मतदारसंघातून येडीयुराप्पाचे पुत्र राघवेंद्र ५२१४८ मतांनी विजयी झाले आहेत.  कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री कुमारस्वाामी यांच्या पत्नी अनिता यांनी रामनगर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचे एल. चंद्रशेखर १०९१३७ मतांनी दारुन पराभव केला आहे. जेडीएसला मिळालेल्या यशानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आहे.

Related posts

हिंदू धर्मा विरोधात कटकारस्थाने शिजत आहेत !

News Desk

दलितांवर खुनी हल्ला करणाऱ्यांना फाशीची शिक्षा करा

News Desk

पंतप्रधान ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ अशी फक्त घोषणाच देतात !

Gauri Tilekar