HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

मिशन दापोली साई रिसॉर्ट!, अनिल परबांविरोधात सोमय्या हातोडा घेऊन सज्ज

मुंबई | भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या रडारवर असलेल्या विरोधी पक्षातील नेत्यांपैकी एक म्हणजे शिवसेना नेते आणि राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब आहेत. किरीट सोमय्या हे गेल्या काही महिन्यांपासून अनिल परब यांच्यावर दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी सातत्याने आरोप करत आहेत. त्यासाठी सोमय्यांनी पाठपुरावा देखील केला असून आता ते या प्रयत्नात यशस्वी देखील झाले आहेत. कारण कथित रिसॉर्ट तोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत, असा दावा सोमय्यांनी केला आहे. त्यानुसार आता ते दापोलीला रवाना झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दापोलीतील कथित रिसॉर्ट पाडण्याचे आदेश रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, असं किरीट सोमय्या यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. यावेळी सोमय्यांनी असं म्हटलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी परवानगी दिली असून अनिल परब यांचं रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. पर्यावरण मंत्रालयाकडे फाईल देण्यात आली आहे, असं  सोमय्या यांनी म्हटलं होतं. तसंच शनिवारी मी दापोलीत जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. तर दिवाळीपर्यंत अनिल परबांचं रिसॉर्ट इतिहासजमा झालेलं असेल असंही सोमय्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे अनिल परबांच्या रिसॉर्टवर हातोडा पडणार असल्याचं आता निश्चितच झालंय. आज सोमय्या त्यासाठीच दापोलीला रवाना झाले.

काय आहे आरोप?

अनिल परब यांचं दापोली येथील समुद्र किनाऱ्यालगत असलेलं साई रिसॉर्ट हे बेकायदेशीर असून या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर करण्यात आला आहे, असा आरोप सोमय्यांनी केला आहे. त्यामुळे या रिसॉर्टवर कारवाई केली जाणार असून या रिसॉर्टसाठी पैसे कुठून आले याचा हिशोब देखील परबांना द्यावाच लागेल, असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे. सीआरझेड नियमांचं उल्लंघन करून परब यांनी हे रिसॉर्ट बांधल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. दरम्यान याप्रकरणी अद्याप तरी अनिल परब यांची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. त्यामुळे परब आता याला कसे सामोरे जाणार हे पाहावं लागेल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अटक,धरपकड करायला गोविंदा काय लादेन आहे का? भाजपचा सवाल!

News Desk

पंतप्रधान मोदी उद्या सकाळपर्यंत करणार ध्यानधारणा

News Desk

“ST प्रकरणात योग्य तो निर्णय उच्च न्यायालय देईल!” | अनिल परब

News Desk