HW News Marathi
राजकारण

जाणून घ्या… पंतप्रधान नरेंद्र मोदींची किती आहे संपत्ती

लखनौ | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२६ एप्रिल) वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोदींनी प्रतिज्ञापत्रात २.५ कोटी रुपयांची संपत्ती असून हातात फक्त ३८ हजार रुपये रोकड असल्याचा उल्लेख केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्‍या माहितीनुसार मागच्या पाच वर्षात २०१४ ते २०१९ दरम्यान नरेंद्र मोदींच्या चल संपत्तीमध्ये ५२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

राजकीय पदांमुळे मिळणारा सरकारी पगार आणि बँकांमध्ये असलेल्या ठेवीवरील व्याजातूनच मोदींना पैसा मिळतो. या व्यतिरिक्त त्‍यांचे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्‍याचे या प्रतिज्ञापत्रात म्‍हटले आहे. विशेष म्‍हणजे मोदींच्या नावावर एकच घर असून त्‍यांच्याकडे एकही गाडी नाही. तर त्‍यांच्या नावावर जमिनही नाही. कोणत्‍याही प्रकारचा गुन्हेगारी आरोप नाही.

लोकसभा निवडणुकांपेक्षा यंदा दुप्पट झाल्याचे दिसून येते. सन २०१३-१४ साली उत्पन्न ९ लाख ६९ हजार ७११ रुपये होते. तर, २०१८-१९ या वर्षभरातील उत्पन्न १९ लाख ९२ हजार ५२० रुपये एवढे आहे. सन २०१४ पासून मोदींच्या संपत्तीत दरवर्षी वाढ झाली आहे. पण २०१६-१७ मध्ये मोदींच्या संपत्तीत २०१५-१६ पेक्षा घट झाल्याचे दिसून येते. जवळपास ४ लाख ७० हजार रुपयांची ही घट दिसत आहे. त्यानंतर २०१८-१९ मध्ये मोदींचे वार्षिक उत्पन्न जवळपास २० लाख रुपये आहे.

जंगम मालमत्तेचे विवरण

  • रोख रक्कम – ३८ हजार ७५० रुपये
  • बँकेतील ठेवी – १ कोटी २७ लाख ८५ हजार ७१७ रुपये
  • गुंतवणूक – २० हजार रुपये (एल अँड टीचे बाँड)
  • गुंतवणूक –७ लाख ६१ हजार ४६६ रुपये (नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट)
  • गुंतवणूक –१ लाख ९० हजार ३४७ रुपये (एलआयसी)
  • दागिने – ४५ ग्रॅमच्या सोन्याच्या ४ अंगठ्या (किंमत – १ लाख १३ हजार ८०० रुपये)
  • इतर – ८५ हजार १४५ रुपये (टीडीएस) आणि १ लाख ४० हजार ८९५ रुपये (पीएमओ)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शिक्षण

  • एसएससी (१९६७) – एसएससी बोर्ड, गुजरात
  • बीए (१९७८) – दिल्ली यूनिव्हर्सिटी, दिल्ली
  • एमए (१९८३) – गुजरात यूनिव्हर्सिटी, अहमदाबाद

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मर्यादित वेळेनंतर फटाके फोडल्याने मुंबईत २ अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल

Gauri Tilekar

संजय राऊतांच्या ED च्या कारवाईबाबत अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Aprna

पंतप्रधान मोदींनी मतदानाच्या दिवशी केलेल्या ‘रोड शो’चा अहवाल आयोगाने मागविला

News Desk