बेंगळुरु | कर्नाटकातील राजकीयनाट्यानंतर कुमारस्वामींचे म्हणजे काँग्रेस-जेडीएसचे सरकार भाजपने पाडले. यानंतर येडीयुराप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. जवळपासून महिनाभरानंतर कर्नाटकातील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. येडीयुराप्पांनी आज (२० ऑगस्ट) १७ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
#Karnataka: B Sriramulu takes oath as Karnataka Cabinet Minister, in the presence of Governor Vajubhai Vala and Chief Minister BS Yediyurappa, in Bengaluru. pic.twitter.com/SFaVmiWDib
— ANI (@ANI) August 20, 2019
येडीयुरप्पांचा रविवारी (१८ ऑगस्ट) गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यानंतर राज्यपाल विजुभाई वाला यांच्याकडे जावून १७ मंत्र्यांच्या नावाची यादी सोपविण्यात आली. कर्नाटक मंत्रिमंडळात बेळगाव जिल्ह्याला दोन मंत्रीपदे, निपाणीच्या शशिकला जोल्ले आणि अथणीचे लक्ष्मण सवदी मंत्रिपदाची शपथ घेतली. भालचंद्र जारकीहोळी, उमेश कत्ती यांना येडीयुरप्पा सरकारने डावलले.
कुमारस्वामींनी दीड वर्ष रडतखडत सरकार चालविले होते. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज असलेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्रास दिला जात होता. यामुळे गेल्याच महिन्यात काँग्रेसचे १२ आणि जेडीएसचे ३ आमदारांनी बंड करून राजीनामे दिले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.