HW News Marathi
राजकारण

मोदी विरोधी एकजुटीचा ट्रेलर लॉन्च

बंगळुरू | कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. जेडीएसचे कुमारस्वामी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री तर काँग्रेसचे के.जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथ विधी सोहळ्या निमित्ताने सर्व मोदी विरोधक एकवटल्याचे चित्र पाहायला मिळाले.

त्यावेळी हा कर्नाटकच्या मुखमंत्र्याचा शपथ विधी सोहळा नसून जणू २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा ट्रेलर लॉन्च सोहळा आहे की काय असे चित्र पहायला मिळाले. शपथविधीनंतर सर्व विरोधकांनी हातात हात घेत जनतेला अभिवादन केले.

त्यांनतर भाजप विरुद्ध सर्व विरोधक असे चित्र मंचावर पाहायला मिळाले. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव, राजदचे तेजस्वी यादव, बसप अध्यक्ष मायावती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॉनर्जी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, टीडीपीचे चंद्राबाबू नायडू, माकप नेते सीताराम येचुरी यांच्यासह सर्वच विरोधी पक्ष्यांच्या सर्व नेत्यांनी या शपथ विधी सोहळ्यात हजेरी लावली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पंतप्रधान मोदींनी कधीच चहा विकला नाही, हा तर सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न !

News Desk

शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरणारा छिंदम तडीपार असूनही विजयी

News Desk

“सर्व आमदार उद्या विश्वासदर्शक ठरावासाठी मुंबईत पोहोचणार,” एकनाथ शिंदेंची माहिती

Aprna
राजकारण

विधानपरिषदेच्या मतमोजणीला सुरुवात

News Desk

मुंबई | विधानपरिषदेच्या ६ पैकी ५ जागांचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी-हिंगोली, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जागांचा निकाल आज जाहीर होणार आहे.

लातूर-बीड-उस्मानाबाद या मतदारसंघाचा निकाल हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राखून ठेवला आहे. त्यामुळे या जागेची मतमोजणी लांबणीवर पडली आहे. या सर्व मतदारसंघात सोमवारी २१ मे रोजी मतदान झाले होते.

Related posts

पंतप्रधान मोदींनी लोकांना देशभक्तीची सर्टिफिकेट वाटू नये !

News Desk

कर्जमाफीसाठीही शेतकऱ्याला ‘अटी व शर्ती’ आणि ‘ऑनलाइन’ नावाखाली रडवले गेले !

News Desk

मतदानाच्या पूर्वसंध्येला जयंत पाटील यांचा नंबर हॅक करून अपप्रचार ! 

News Desk