HW News Marathi
राजकारण

वन खात्याचे नाव बदलून शिकारी खाते असे करायला हवे!

मुंबई | वन विभागाच्या रेस्क्यू टीमकडून एका नरभक्षक (टी-१) वाघिणीला शुक्रवारी रात्री ठार करण्यात आले आहे. या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या ४७ दिवसांपासून वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. या वाघिणीने आतापर्यंत तब्बल १४ जणांचा जीव घेतला असून गेल्या अनेक दिवसांपासून तिच्यामुळे गावांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र टी-१ वाघिणीच्या मृत्यूनंतर वन्यजीव प्रेमींनी वनविभागावर टीका केली आहे. ‘वन खात्याचे नाव बदलून शिकारी खाते असे करायला हवे‘ अशी टीका टी-१ वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरवरून वन मंत्रालयावर केली आहे.

वाघिणीला मारण्याची न्यायालयाकडून परवानगी होती का? तिला बेशुद्ध करून पकडता आले नसते का? एक वन्यजीवप्रेमी म्हणून आपल्याला पडलेले हे प्रश्न आहेत. मात्र आज अवनीला ठार केले. उद्या तिच्या बछड्यांचा किंवा आणखी दुसऱ्या वाघाचा बळी घेतला जाईल, असा असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. वाघिणीला आधी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तिने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने तिला गोळी घालण्यात आली. वन विभागाने दिलेल्या या माहितीवर वन्यजीव प्रेमींनी संशय उपस्थित केला आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवसेनेची अयोध्यावारी ही राजकीय चूक ?

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी ६९वा वाढदिवसानिमित्त गुजरात दौरा

News Desk

सुखबीर सिंग बादल यांना विचारांची बद्धकोष्ठता । नवज्योतसिंग सिद्धू

News Desk
देश / विदेश

जे माझ्यासारखे अविवाहित आहेत त्यांचा विशेष सन्मान व्हावा !

Gauri Tilekar

हरिद्वार | योगगुरू बाबा रामदेव पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येच्या समस्येवर भाष्य करताना रामदेव बाबा म्हणाले कि ‘जे लोक दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देतील, त्यांना मतदानाचा अधिकार देऊ नये’. तसेच, ‘माझ्याप्रमाणे जे लोक अविवाहित आहेत, त्यांना समाजात विशेष सन्मान व्हायला हवा’, असेही त्यांनी म्हटले आहे. ते हरिद्वारमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

 

Related posts

अहमदाबाद कोविड सेंटरमध्ये लागली आग, ८ रुग्णांचा मृत्यू

News Desk

गर्भपाताचा परवानगी नाकरलेली ‘ती’ने दिला बाळाला जन्म

News Desk

येडियुरप्पा देणार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा ?

News Desk