HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर

मुंबई | १७व्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आज (१४ मार्च) लोकसभा उमेदवारांची पहिल यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीने पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती. ही यादी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नवाब मलिक, हेमंत टकले उपस्थित होते. या यादीमध्ये महाराष्ट्रातील १० आणि लक्षद्वीपमधील १ अशा ११ नावांची घोषणा करण्यात आली आहे.

तसेच हातकणंगले लोकसभाची जागा स्वाभिमानी संघटनेसाठी सोडली असल्याचे जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. परंतु राष्ट्रवादीच्या मावळ, माढा, अहमदनगर, बीड आणि गोंदिया या बहुचर्चित जागांवर उमेदवारांची नावे निश्चित झाली नाही. काही जागा काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अदलाबदली करण्याची बोलणी सुरू असल्याचे जयंत पाटील यांनी सागंतिले आहे.

 

राष्ट्रवादी काॅंग्रेस पहिल यादी जाहीर

  • रायगड – सुनिल तटकरे
  • बारामती – सुप्रिया सुळे
  • सातारा – उदयन राजे भोसले
  • कोल्हापूर – धनंजय महाडिक
  • जळगांव – गुलाबराव देवकर
  • बुलडाणा – रांजेंद्र शिंगणे
  • परभणी – राजेश विटेकर
  • मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील
  • ठाणे – आनंद परांजपे
  • कल्याण – बाबाजी पाटील
  • लक्षद्वीप – मोहम्मद फैझल
  • हातकणंगले – स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निरंजन डावखरेंचा गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश

News Desk

लोकसभेत अदानीच्या मुद्द्यांवरून विरोधकांचे गदारोळ; लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

Aprna

सरकारने कांदयाला दिलेले अनुदान शेतकऱ्यांची चेष्टा करणारे !

News Desk