HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : जाणून घ्या… राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी

मुंबई | लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने पनवेल येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकी बोलविली होती. या बैठकीदरम्यान अजित पवारांच्या उपस्थितीत १२ संभाव्य उमेदरावांची पहिली यादी जाहीर केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

काँग्रेसने गेल्या आठवड्यात १५ उमेदवारांची पहिल यादी जाहीर केली होती. यात स्वत: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावाचाही समावेश आहे. राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठी तर सोनिया गांधी रायबरेली या पारंपरिक मतदारसंघामधून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. काँग्रेसने जाहीर केलेल्या १५ उमेदवारांपैकी ११ जागा उत्तर प्रदेश तर ४ जागा गुजरातमधील आहेत.

संभाव्य उमेदवारांची यादी

  • नाशिक – समीर भुजबळ
  • बुलढाणा – राजेंद्र शिंगणे
  • सातारा – छत्रपती उदयनराजे भोसले
  • मावळ – पार्थ पवार
  • कोल्हापूर – धनंजय महाडिक
  • भंडारा – गोंदिया – वर्षा पटेल
  • जळगाव – गुलाबराव देवकर
  • रायगड – सुनील तटकरे
  • शिरूर – अमोल कोल्हे
  • ठाणे – आनंद परांजपे
  • ईशान्य मुंबई – संजय दीना पाटील
  • बारामती – सुप्रिया सुळे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा; काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Aprna

मतदारांना जागरुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘टॅग मिशन’

News Desk

आंध्रची विधानसभा स्टॅच्यू ऑफ युनिटीला टक्कर देणार का?

News Desk