HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, या २० नावांचा समावेश

मुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी आज (२७ मार्च) जाहीर केली आहे. या यादीमध्ये २० स्टार प्रचारकांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा समावेश आहे.

देशभरात लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार असून महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यामध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिलला पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीने  सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला आहे.

तसेच भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत ४२ नावांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपच्या अन्य अनेक नेत्यांचा या यादीत समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यास्टार प्रचारकांच्या यादी ४० नावांचा समावेश जाहीर केली आहे. महाराष्ट्राच्या स्टार प्रचारकांच्या यादीत ४० दिग्गज नेत्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.

Related posts

बोरिवलीत राष्ट्रवादीचा भाजप विरोधात गाजर वाटप करून विरोध

News Desk

वनगांची उमेदवारी अद्याप प्रतिक्षेत

News Desk

#MarathaReservation : मराठा समाजासाठी ऐतिहासिक दिवस, १६ टक्के आरक्षण जाहीर

News Desk