HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

Lok Sabha Election 2019 : ‘पहले मतदान फिर जलपान’, पंतप्रधान मोदींचे ट्वीट करत नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली | १७ व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशातील २० राज्यात ९१ मतदारसंघात आज (११ एप्रिल) मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. खासकरुन तरुण आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना मोठ्या संख्येने घराबाहेर पडा. ‘पहले मतदान फिर जलपान’ अशी विनंती मोदींनी ट्वीट करत केली आहे.

‘लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. लोकशाहीच्या या उत्सवात नक्की सहभागी व्हा अशी माझी सर्वांना विनंती आहे. जास्तीत जास्त संख्येने मतदान करा. खासकरुन तरुण आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडा. पहले मतदान फिर जलपान’ असे ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील विदर्भातील ६ जिल्ह्यातील ७ मतदारसंघामध्ये मतदान सुरू झाले आहे. यात  वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम अशा एकूण सात मतदारसंघांत मतदानाला सुरुवात झाली आहे. नागरिकांमध्ये निवडणुकांचा उत्साह दिसत असून मतदान केंद्रावर रांगा लागत आहेत.

 

Related posts

रात्रभर यूट्यूबवर व्हिडिओ बघतात, सकाळी ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणतात !

News Desk

‘पार्थ पवारांना मत द्या’ सांगत पैसे वाटणारे शेकाप कार्यकर्ते ताब्यात

News Desk

#LokSabhaElections2019 : निवडणुकांच्या तारखांवरून वाद निर्माण करणाऱ्यांना ओवेसींनी सुनावले

News Desk