HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मतदान करणे हे आपले कर्तव्य, सर्वांनी आपले कर्तव्य बजावण्याची गरज | मोहन भागवत

नागपूर | “मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. सर्वांनी आपले कर्तव्य बजावण्याची गरज आहे,” असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. भागवत यांनी मतदान करण्यासठी सकाळी लवकरच केंद्रावर पोहोचले होते. भागवत यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातील २१६ क्रमांकाच्या मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. सर्वांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. तसेच स्वर्गीय भाऊजी दफ्तर उच्च प्राथमिक शाळेच्या संघ बिल्डिंगमागील मतदान केंद्रात भागवत यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

१७ व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशातील २० राज्यात ९१ मतदारसंघात आज (११ एप्रिल) मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू असणार आहे.  पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील विदर्भातील ६ जिल्ह्यातील ७ मतदारसंघामध्ये मतदान सुरू झाले आहे. यात  वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम अशा एकूण सात मतदारसंघांत मतदानाला सुरुवात झाली आहे.

 

Related posts

मोदी सरकारचा क्रांतिकारक निर्णय

News Desk

मोदींच्या तामिळनाडू दौऱ्याला ट्विटरवर #GoBackModi द्वारे जोरदार विरोध

News Desk

सध्याच्या शिवसेनेचे धंदेवाईक राजकारण सुरु !

Shweta Khamkar