HW News Marathi
राजकारण

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : देशभरासह महाराष्ट्रात चौथ्या टप्प्याचे मतदान

मुंबई | देशभरात आज (२९ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रासह देशभरात ९ राज्यातील ७१ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रात एकूण १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. हा टप्पा महाराष्ट्रातील लोकसभेचा चौथा आणि अंतिम टप्पा आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. देशात एकूण ७ टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे.

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE

  • जाणून घ्या…संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात अंतिम टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी

  • मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.७४ टक्के मतदान
  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

  • दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील सरासरी मतदानाची टक्केवारी

  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

  • सकाळी ११ वाजेपर्यंतची महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

  • केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मतदानानंतर दिली ‘ही’ प्रतिक्रिया

  • कलाकार उमेश पांचाळ यांनी रांगोळीच्या माध्यमातून केली मतदानाविषयी जनजागृती

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे मतदान करण्यासाठी बालमोहन शाळेत

  • सपा नेते अबू आझमी यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

  • कांदिवलीमध्ये मतदानासाठी भलीमोठी रांग

  • शिवसेना नेते सदा सरवणकर आणि समाधान सदा सरवणकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.

  • दिलीप वळसे-पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • भाजपचे धुळे मतदारसंघाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • शिवसेनेचे शिरूर मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सहकुटुंब केले मतदान

  • प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • भांडूप पूर्व येथे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • सकाळी ९ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

  • मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले मतदान

  • प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अमीर खान यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

  • शिवसेनेचे कल्याण मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे ईशान्य मुंबईचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी सहकुंटुब बजावला मतदानाचा हक्क

  • काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी केले मतदान

  • दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • शिवसेनेचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

  • आतापर्यंत मावळ, डहाणू, भांडूप आणि नाशिकमधील विहितगाव येथे एव्हीएममध्ये तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी
  • “सत्ता परिवर्तन होणारच” मतदानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास

  • मतदानानंतर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी सपत्नीक केले मतदान

  • प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने बजावला मतदानाचा हक्क

  • काँग्रेसच्या उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार प्रिया दत्त यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • काँग्रेसच्या उत्तर मुंबई मतदारसंघाच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • जुहू येथे ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी केले मतदान

  • शिक्षण मंत्री विनोद तावडे, पत्नी वर्षा तावडे आणि मुलगी (नवमतदार) अन्वी विनोद तावडे यांनी बजावला मतदानाचा हक्क.

  • भाजप नेते किरीट सोमय्या सहकुटुंब मतदान केंद्रावर दाखल

  • बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा मतदान केंद्रावर

  • प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

  • भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

  • भाजपचे विद्यमान खासदार परेश रावल यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

  • भाजपचे गोरखपूरचे उमेदवार रवी किशन यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मनोज कोटक यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • भाजपच्या उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार पूनम महाजन यांनी बजवला मतदानाचा हक्क

  • आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • वांद्रे येथे ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • मतदानाचा हक्क बजावणासाठी मुंबईकर सज्ज

  • उद्योगपती अनिल अंबानी यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्या वसुंधराराजे यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • मतदान केंद्राबाहेर सकाळी 7 वाजताच मतदानासाठी रांगा

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्याच्या घटलेल्या उत्पन्नाची सत्ताधाऱ्यांना जाणीव आहे का? 

News Desk

प्रमोद सावंत यांनी राजभवनात घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

News Desk

उत्तर प्रदेशात पंतप्रधान मोदी विरुद्ध योगी आदित्यनाथ

News Desk