HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अचानक जानकरांचा सूर बदलला !

मुंबई | राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना डावलून भाजपकडून बारामती लोकसभा मतदारसंघातून रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आल्याने महादेव जानकर आक्रमक झाले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अचानक जानकरांचा सूर बदलला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुन्हा नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान बनविण्यासाठी मनापासून काम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे भाजपने म्हटले आहे.

“तुमचा निर्णय तुम्हाला लखलाभ असो. आम्ही तुमच्यासोबत असलो तरीही आम्ही रासपच्याच चिन्हावर निवडणूक लढविणार”, असे महादेव जानकर स्पष्ट केले होते. मात्र, आता मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर जानकरांची नाराजी दूर झाली आहे. “युतीतील सर्व घटकपक्ष हे एकत्रितपणे काम करतील, महायुती आणखी भक्कम करतील. पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मनापासून काम करतील”, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याचे ट्विट भाजपने केले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत.

Related posts

#ElectionsResultsWithHW : देशातील प्रतिष्ठेच्या लढती

News Desk

तिहेरी तलाकच्या नव्या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा

News Desk

मराठ्यांसाठी शिवसेना आमदाराचा राजीनामा

News Desk