HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : अखेर जालन्यातून अर्जुन खोतकरांची माघार

मुंबई | जालन्यातून अखेर शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी अखेर माघार घेतल्याची माहिती मिळत आहे. औरंगाबाद येथे आज (१७ मार्च) झालेल्या शिवसेना-भाजपच्या बैठकीत अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे. गेले अनेक दिवस जालना लोकसभा मतदार संघावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात वाद सुरु झाला होता. अनेक बैठकांनंतरही जालन्याच्या या मतदारसंघांचा तिढा सुटता सुटत नव्हता. मात्र, अखेर आज औरंगाबादच्या बैठकीनंतर याबाबतचा स्पष्ट झाला असून जालना मतदारसंघातून अखेर अर्जुन खोतकर यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे रावसाहेब दानवेंचा मार्ग मोकळा झाला आहे.

जालना मतदारसंघाचा तिढा सोडविण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी शनिवारी (१६ मार्च) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली होती. यावेळी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे या समन्वयक म्हणून उपस्थित होत्या. “रविवारी औरंगाबाद येथील बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय होईल”, असे खोतकर यांनी स्पष्ट केले होते.

“मी उद्धव ठाकरे यांच्यापुढे प्रस्ताव ठेवले आहेत. जालन्यात एक तर मैत्रीपूर्ण लढत व्हावी किंवा जालना शिवसेनेला सुटावी. जालन्याची जागा शिवसेना निश्चित जिंकून येईल, हा विश्वास मला आहे. मी हे उद्धव ठाकरेंना पटवून दिले आहे”, अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली होती. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल, असेही अर्जुन खोतकर यांनी म्हटले होते.

Related posts

राष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदींनी काय केले ?

News Desk

राफेल प्रकरणात लपवण्यासारखे आता काहीच उरले नाही !

News Desk

अहमदनगर महानगरपालिकेमध्ये त्रिशंकू अवस्था

News Desk