मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने देशातील अन्य सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून महाआघाडी स्थापन करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या महाआघाडीत समाविष्ट असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य लहान-मोठया राजकीय पक्षांचा समावेश असलेल्या महाआघाडीची आणि जागावाटपाची शनिवारी (२३ मार्च) अधिकृत घोषणा झाली आहे. ‘संयुक्त पुरोगामी महाआघाडी’ची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत अखेर ‘संयुक्त पुरोगामी महाआघाडी’ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
Maharashtra Congress Chief Ashok Chavan: Congress to contest on 24 seats, NCP on 20 seats, Bahujan Vikas Aghadi on 1 seat, Swabhimani Shetkari Sanghatana on 2 seats, Yuva Swabhimani Paksha on 1 seat. pic.twitter.com/nCwkWfo6Bp
— ANI (@ANI) March 23, 2019
पत्रकार परिषदेत काय म्हणाले अशोक चव्हाण ?
- स्वातंत्र्य, समता, बंधुता याला न्याय मिळाला म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत.
- भाजपकडून साम-दाम-दंड भेद याचा वापर केला जात आहे.
- भाजपने दिलेल्या घोषणांपैकी एकही घोषणा पूर्ण केली नाही. केवळ आश्वासने दिली आहेत.
- हे जुमलेबाजी करणारे सरकार आहे.
- जनतेला याची चीड आहे. समाजात व जातीपातीवरून भांडणे लावण्याचे काम सुरू आहे.
- भाजप-सेनेकडून राजकीय फायद्यासाठी भीमा-कोरेगावसारख्या घटना घडवून आणल्या गेल्या.
- या सरकारच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्या वाढल्या.
- त्यांची कर्जमाफीची घोषणा देखील फसवी आहे.
- धनगर आरक्षण देणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी ते केले नाही.
पत्रकार परिषदेत काय म्हणाले जयंत पाटील ?
- आम्ही या देशातील लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी एकत्र आलो आहोत.
- आम्ही समविचारी पक्ष एकत्रित आलो आहोत.
- केंद्र व राज्य सरकाच्या चुकीच्या धोरणांमुळे संपूर्ण जनता त्रस्त आहे
- देशाचे पंतप्रधान गुपचुप पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मेसेज करत आहेत. त्यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे.
- ही आघाडी करत असताना ४८ जागांपैकी ३८ जागी काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसला तर मित्र पक्षांना १० जागा देण्याचा निर्णय घेतला.
- जे आमच्या सोबत आले नाही ते भाजपची बी टीम म्हणून काम करत आहेत
- चर्चेच्या वेळी काहींनी खूप टोकाची भुमिका घेतली, अजित पवार यांची प्रकाश आंबेडकरांवर टीका
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.