HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : काँग्रेसने ‘या’ अनुभवी उमेदवारांना दिली पुन्हा संधी

मुंबई | लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्व राजकीय पक्षांची उमेवारांची नाव जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने काल (१३ मार्च) २१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातून ५ तर उत्त प्रदेशातून १६ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे.

काँग्रेसने पुन्हा एकदा अनुभवी उमेदवारांना तिकीट दिली आहे. नागपूरमधून नाना पटोले, सोलापूरमधून ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि दक्षिण मुंबईमधून मिलींद देवरा, उत्तर मध्य मुंबईमधून प्रिया दत्त हे अनुभवी उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या या दुसऱ्या यादीत एकूण २१ उमेदवारांची नावे आहेत. त्यापैकी ५ उमेदवार हे महाराष्ट्रातील असून अन्य १६ उमेदवार उत्तर प्रदेशातील आहेत

काँग्रेसच्या अनुभवी उमेदवारांचा अल्पपरिचय 

प्रिया दत्त

प्रिया दत्त या दिवंगत अभिनेते आणि काँग्रेस नेते सुनिल दत्त यांची कन्या आहेत. सुनिल दत्त यांच्या मृत्यूनंतर २००९ मध्ये प्रिया दत्त यांनी उत्तर मध्य मुंबईच्याच जागेवरुन जिंकून खासदार झाल्या होत्या. २०१४ च्या निवडणुकीत मात्र त्यांना भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा १.८६ लाख मतांनी पराभव केला होता. काँग्रेस पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर आता प्रिया दत्त मतदारसंघ पुन्हा कामाला लागल्या आहेत.

मिलिंद देवरा

मिलिंद हे काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा यांचे पुत्र आहेत. मिलिंद देवरा हे राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे मिलिंद देवरांना यांची राहुल गांधी यांनी समजूत काढून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. मिलिंद देवरा २००९ मध्ये दक्षिण मुंबईचे खासदार होते. मात्र २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी देवरांना एक लाख २८ हजार ५६४ मतांनी पराभव केला होता. २०१९ मध्ये निवडणूक लढवून पुन्हा एकदा पराभवाचा सूड घेण्याची संधी काँग्रेसने दिली आहे.

सुशील कुमार शिंदे

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या शरद बनसोडेंनी शिंदेंना पराभव केला होता. २००९ च्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदेंनी ९९ हजार ६३२ म्हणजेच जवळपास लाखभर अधिक मतांनी बनसोडेंना पराभूत केले होते. परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद बनसोडेंनी सुशीलकुमारांना दीड लाखांच्या मतानी पराभव केला. त्यामुळे २००९ च्या निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा बनसोडे यांचा पराभव करण्यासाठी काँग्रसेने सुशील कुमार शिंदे यांना संधी दिली आहे.

नाना पटोले

भाजपमधून बंडखोरी करत खासदार नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आता पटोले यांना काँग्रेसकडून उमदेवारी मिळाली होती. यानंतर पटोले हे नागुपरातून निवडणूक लढवणार आहेत. २०१४ मधील निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर नाना पटोले भंडारा-गोंदियातून निवडून आले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला खडे बोल सुनावत त्यांनी २०१७ साली पक्षाला रामराम ठोकला. जानेवारी २०१८ मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत.

Related posts

धनंजय… या खड्ड्यांचा सेल्फी काढून तूच त्या चंद्रकांतदादा पाटलांना पाठव रे बाबा

Ramdas Pandewad

जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्या खात्यांत मोठे बदल

News Desk

राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांबद्दल सेहवागने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk