HW News Marathi
राजकारण

अमित ठाकरे यांनी उदयनराजे भोसले यांची घेतली भेट

मुंबई | मनसे नेते आणि विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे हे आज (29 जानेवारी) साताऱ्यात आहेत. यावेळी अमित ठाकरेंनी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची सदिच्छा भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान अमित ठाकरे आणि उदयनराजे यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. परंतु, अमित ठाकरे आणि उदयनराजे यांच्या भेटीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

मनसेचे सध्या राज्यभरात महासंपर्क अभियान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.  साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी स्थळाची देखील अमित ठाकरेंनी भेट देत पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. अमित ठाकरे हे सातारा दौऱ्यादरम्यान मनसे विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. अमित ठाकरे हे साताऱ्यात पक्षाची मोर्चे बांधणी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

उदयनराजे भोसलेंनी अमित ठाकरेसोबत झालेल्या भेटीबद्दल बोलताना म्हणाले, “अमित ठाकरे घरी आल्यावर मला माझा मुलगा घरी आल्यासारखे वाटले. अमित ठाकरेसारख्या तरुण नेत्यांनी पुढे आले पाहिजे. या माध्यमातून लोकांची सेवा केली. तर ठाकरे घराण्याचा इतिहास मोठा आहे.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय”, शरद पवारांची मिश्किल टीका

Aprna

वर्षभरापूर्वी काश्मीरमध्ये सरकार चालवत होतात ते कोणत्या देशात ?

News Desk

भाजपने धनगर समाजाला सर्वाधिक न्याय दिला | चंद्रकांत पाटील

News Desk