HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : निवडणुकांच्या तारखांवरून वाद निर्माण करणाऱ्यांना ओवेसींनी सुनावले

मुंबई | एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी आगामी निवडणुकांच्या तारखांवरून वाद निर्माण करणाऱ्या मुस्लिम नेत्यांना सुनावले आहे. “जर रमजानच्या महिन्यात लोक कामाला जाऊ शकतात, तर मतदान करायला का जाऊ शकत नाहीत ?”, असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगाने रविवारी (१० मार्च) आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांची मतदान प्रक्रिया ही रमजान महिन्यात येत असल्याने मुस्लिम नेते आणि मौलवींनी थेट निवडणूक आयोगाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत तारखा बदलण्याची मागणीही केली होती.

“निवडणूक आयोग एक संवैधानिक संस्था आहे. आम्ही त्याचा आदरही करतो. आम्ही निवडणूक आयोगाविरोधात काही बोलू इच्छित नाही. मात्र, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या लोकांसाठी या निवडणुका कठीण असतील. या तारखा रमजान महिन्यात ठेवण्यात आल्याने सर्वाधिक त्रास मुस्लिमांना होईल”, असे कोलकाताचे महापौर आणि तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हाकिम यांनी म्हटले होते. दरम्यान, “रमजान महिन्यात मतदान प्रक्रिया होण्याबाबत आपल्याला काहीच आक्षेप नाही”, असेही ओवैसी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Related posts

शिवसेनेला मत देणे छिंदमला पडले महागात, शिवसैनिकांकडून मारहाण

News Desk

राजकारण व्यासपीठ आणि छत्रपती

News Desk

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा भारतरत्न किताबाने गौरव होण्यासाठी प्रयत्न करणार

News Desk