HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : अयोध्येतून होणार प्रियांका गांधींच्या रथयात्रेला सुरुवात

नवी दिल्ली । काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या उत्तर प्रदेशमधील रथयात्रेची सुरुवात अयोध्येतील हनुमान गढीतील पूजेने होणार असल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी (२७ मार्च) त्यांच्या या रथयात्रेला सुरुवात होईल. या रथयात्रेत प्रियांका गांधी फैजाबाद, सुलतानपूर, अमेठी, रायबरेली व उन्नाव या मतदारसंघांत जाणार आहेत.

प्रियांका गांधी यांचा हा दौरा ३ दिवस चालणार असून या दरम्यान ३२ ठिकाणी त्या जनतेशी संवाद साधणार आहेत. अयोध्येतील हनुमान गढीतून त्यांच्या रथयात्रेला सुरुवात होईल. त्यामुळे प्रियांका गांधी यांच्या या दौऱ्यांची प्रचंड चर्चा आहे. प्रियांका गांधी यांचा हा दौरा सुरू होण्यापूर्वीच ठिकठिकाणी बॅनरबाजीला सुरूवात झाली आहे. या बॅनर्सवर प्रियांका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा उल्लेख ‘रामभक्त’ असा करण्यात आला आहे.

Related posts

सेना-भाजपमध्ये युतीचा तिढा अखेर सुटला ?

News Desk

#Results2018 : राजस्थानमध्ये काँग्रेस सुसाट

News Desk

नीरव मोदी, ललित मोदी आणि अंबानींच्या मांडीवर बसलेले नरेंद्र मोदी !

News Desk